‘फक्त सहा ओळी’,शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्याच्या प्रस्तावात काय?
Sharad Pawar resignation rejected : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावर अध्यक्ष समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर पक्षाचे उपाध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी या बैठकीतला तपशील पत्रकार परिषद घेऊन सांगितला. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात आला.यासोबत सर्वानूमते शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती […]
ADVERTISEMENT
Sharad Pawar resignation rejected : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावर अध्यक्ष समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर पक्षाचे उपाध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी या बैठकीतला तपशील पत्रकार परिषद घेऊन सांगितला. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात आला.यासोबत सर्वानूमते शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात आल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी यावेळी दिली. (Sharad Pawar resignation rejected praful patel tell media Whats in the proposal)
ADVERTISEMENT
प्रफुल पटेल काय म्हणाले?
शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर माझ्या सारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पवार यांची वारंवार भेट घेतली होती.देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि माझ्याकडे त्यांच्या भावना फोनवरून व्यक्त केल्या होत्या. यासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या भावना गेले अनेक दिवस पाहायला मिळाल्या होत्या. तसेच देशाला, राज्याला, पक्षाला तुमची आवश्यकता आहे, या पक्षाचे नाव आणि आधारस्तंभ तुम्हीच आहात. राज्यातीलच नव्हे तर देशात पवार सन्मानीत नेते आहात, त्यांचा अनुभव हा देशासाठी मोलाचा असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले.त्यानुसार शरद पवार यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात आल्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्य़ात आला असल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली होती.
हे ही वाचा : शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळला! बैठकीत काय झालं?
प्रस्तावात काय?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आदरणीय पवार साहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे.
हे वाचलं का?
प्रफुल पटेल यांनी हा संपूर्ण प्रस्ताव मीडियासमोर वाचूव दाखवला. या प्रस्तावात शरद पवार यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात आल्याचा ठराव मांडण्यात आल्याची माहिती दिली. यासोबत सर्वानुमते शरद पवार यांची पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती देखील करण्य़ात आली आहे. आता हा प्रस्ताव घेऊन शरद पवार यांची भेट घेतली जाणार आहे.त्यानंतर पवारांना अध्यक्ष समितीची ठराव संपूर्द करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शरद पवारांच्या मनधरणीसाठी देशातील ‘हे’ नेते सरसावले! काय घडलं?
‘या’ नेत्यांशी चर्चा
एम के स्टॅलिन, सिताराम येंचूरी यांच्यासह शरद पवार यांची केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन,समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार या सर्व नेत्यांशी चर्चा झाली होती.या चर्चेत शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याचा सल्ला देण्यात आला. या सल्ल्यानंतर आता शरद पवार काय निर्णय़ घेणार याकडे संपु्र्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT