‘वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी आम्हाला…’, मुनगंटीवारांची शरद पवारांवर बोचरी टीका
Maharashtra politics news marathi: शरद पवार हे सध्या पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. याच मुद्द्यावरुन भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. पाहा मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंड केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते करत आहेत. असं असताना आता या सगळ्याला भाजपचे (BJP) नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ज्यांनी वसंतदादा पाटलांच्या (Vasantdada Patil) पाठीत खंजीर खुपसला.. त्यांनी आता आम्हाला त्याबाबत सांगावं..’ असं म्हणत मुनगंटीवारांनी टीका केली. (sharad pawar tour of maharashtra ncp party building bjp minister sudhir mungantiwar strongly criticized ajit pawar marathi political news)
ADVERTISEMENT
‘आमदार टिकवता आले नाही, भाजपला का दोष देता?’
‘बुंदे से गई वो हौद से नही आती, जर तेव्हा भाकरी फिरवली असते.. 2014 पासून ठरलं ते केलं असतं तर कार्यकर्ते व सहकाऱ्यांच्या विश्वास बसला असता. मला या दोन्ही नेत्यांबद्दल प्रचंड सहानुभूती आहे, कारण भाजपवर टीका करण्याआधी स्वतःचही आत्मचिंतन करावं. जर तुमच्या स्वभावामध्ये आपली लोकप्रतिनिधी टिकवण्याची शक्ती राहिली नाही, आचरणाने प्रेमाने आपले लोकप्रतिनिधी टिकवता आले असते. भारतीय जनता पार्टीला कशाला दोष देता.. आम्ही देशाच्या विकासाचं राजकारण करतो. असं म्हणत भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.
‘शरद पवारांचा हा दौरा फुसकाच होईल..’
‘वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर ज्यांनी खुपसला, ज्यांनी राजीव गांधींचा अवमान केला.. त्यांनी आम्हाला सांगायचं.. आता दौरे करून तुम्ही संघटन बांधणीच करू शकत नाही हे लोकांच्या लक्षात आलं आहे. तुम्हाला देशाशी काही देणंघेणं नाही. केवळ तुम्हाला मोदींना विरोध करायचा आहे. कृषी मंत्री असताना 70-80 हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. त्या होण्यामागे काय कारण होतं? म्हणून आता कितीही दौरा केला तरी हा दौरा फुसकाच होईल.. अजूनही काही लोक संपर्कात आहे तेही दादांसोबत येतील.’ अशी जोरदार टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> ‘तुम्हाला काय वाटतं मी गेले असते तर, मला…’, सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट, अजितदादांवर हल्लाबोल
‘आमची खाती काढून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना द्यायची म्हणून…’
‘आमची खाते काढून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना द्यायची आहे. म्हणून कदाचित खाते वाटपात वेळ होत असेल किंवा मंत्रिमंडळाचा पुन्हा एक विस्तार बाकी आहे त्यामुळे खाते वाटपात उशीर होत असेल.’ असंही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
शरद पवारांचा झंजावाती दौरा सुरू
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे पक्ष बांधणीसाठी कामाला लागले आहेत. अजित पवारांच्या शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे कराडला प्रीतीसंगमावर गेले. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Exclusive: ‘अजितला तीनदा उपमुख्यमंत्री केलं, पण सुप्रियाला…’, शरद पवार अखेर मनातलं बोललेच!
त्यानंतर आजपासून (8 जुलै) शरद पवार हे पुन्हा लोकांमध्ये जाऊन जे आमदार फुटले आहेत त्यांच्याविरोधात सभा घेत आहेत. याची सुरुवात त्यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघातून केली आहे. जिथे त्यांच्या सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT