Sharad Pawar vs Ajit Pawar : काकांनी भाकरी फिरवली, पुतण्याने तवाच उलटला; असं घडलं राष्ट्रवादीत बंड!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Politics : NCP : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी (2 जुलै) पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी 2019 मध्येही अशीच बंडखोरी करत गुपचुप उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी फरक फक्त इतकाच आहे की त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आणखी 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण, या बंडाची सुरूवात कधी आणि कशी झाली हे ही खूप रंजक आहे. (Sharad Pawar vs Ajit Pawar big twists IN NCP)

ADVERTISEMENT

2019 मध्ये पहिले बंड!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली होती, त्यात भाजप आणि तत्कालीन शिवसेनेने एकत्र लढून यश मिळवले होते. पण मुख्यमंत्रिपदावरून बोलणी फिस्कटल्याने युती तुटली.

भाजपसोबत गेले अन् मंत्री झाले! राष्ट्रवादीच्या नेत्यांवर काय आहेत भ्रष्टाचाराचे आरोप?

भाजपसोबतची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरला होता. पण मध्येच अजित पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राजकीय वर्तुळाला मोठा हादरा दिला.

हे वाचलं का?

शरद पवारांची खेळी, अजित पवारांसोबत गेलेले आमदार परतले

त्यानंतर शरद पवार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवारांना आपला पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं. त्याचबरोबर सुत्रं हलवत अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना परत आणलं. बहुमत सिद्ध करू न शकल्याने देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचं सरकार तीन दिवसातच कोसळलं. यामुळे राष्ट्रीय राजकारणातील शरद पवार यांचं स्थान आणखी बळकट झालं.

NCP: प्रफुल पटेलांकडून नियुक्त्या! आव्हाडांनी शरद पवारांचं थेट पत्रच काढलं, म्हणाले…

29 जून 2023 रोजी शरद पवार यांनी एक विधान केले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 2019 च्या या बंडाचा संदर्भ देत पवार म्हणाले होते, ‘मला हे सिद्ध करायचे होते आणि ते सिद्ध झाले. तुम्ही याला माझा षड्यंत्र किंवा काहीही म्हणू शकता. ते तुम्ही ठरवायचे आहे.’ शरद पवारांना या विधानातून हे दाखवून द्यायचं होतं की, अजित पवारांनी बंडखोरी केली नव्हती, पण फडणवीसांना पाठिंबा देऊन सरकार स्थापन करणे आणि नंतर ते पाडणे या दोन्ही गोष्टी शरद पवारांच्या योजनेचा भाग होत्या.

ADVERTISEMENT

शरद पवारांचं एप्रिल 2023 मधील भाकरी फिरवण्याचं ते विधान…

27 एप्रिल 2023 रोजी मुंबईत आयोजित युवा मंथन कार्यक्रमात शरद पवार म्हणाले होते, ‘भाकरी योग्य वेळी फिरवावी लागते आणि ती योग्य वेळी न फिरवल्यास ती करपते. आता भाकरी फिरवण्याची योग्य वेळ आली आहे, त्यात उशीर होता कामा नये. या संदर्भात मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यावर काम करण्याची विनंती करणार आहे.’ शरद पवारांच्या या वक्तव्याने ते कुठेतरी हे अजित पवारांना संबोधून बोलत असल्याचं मानलं जात होतं. त्यानंतर अचानक अशा अनेक घटना घडल्या, त्यावरून अजित पवार आता केव्हाही बंडखोरी करू शकतात, हे स्पष्ट झालं होतं. फक्त ते योग्य संधीची वाट पाहत होते.

ADVERTISEMENT

2 मे 2023 रोजी शरद पवारांनी अचानक घेतलेला राजीनाम्याचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी 2 मे 2023 रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली तेव्हा सगळीकडेच खळबळ उडाली होती. त्यांनी जागी कोण कारभार सांभाळणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. यादरम्यान, आणखी एक महत्त्वाची घोषणा करत पवार यांनी समितीचीही स्थापना केली असून ही समिती बसून, बैठक घेऊन नवा अध्यक्ष कोण होणार हे ठरवेल, असे सांगितले. त्यावेळी सर्व नेत्यांनी पवार यांना राजीनामा मागे घेण्यास सांगितले मात्र त्यांनी राजीनामा मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर पक्षाचे नेते व कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. खूप समजावून सांगितल्यानंतर त्यांनी अखेर 5 मे रोजी राजीनामा मागे घेतला.

Ncp :जयंत पाटलांना हटवलं! राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यपदी सुनील तटकरे

10 जून 2023 रोजी बंडाची बीजे पेरली गेली होती का?

राष्ट्रवादीत आतापासूनच फूट आधीच पडली होती. अजितदादा बंड करणार असल्याचं अनेक दिवसांपासून म्हटलं जात होतं अशा स्थितीत, 2 मे 2023 रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. हा घटनाक्रम शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक मानला जात होता. राष्ट्रवादीत आता सर्व काही ठीक असल्याची चर्चा होती.

मात्र यादरम्यान, 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या 25 व्या स्थापना दिनानिमित्त शरद पवार यांनी पुतणे अजित पवार यांना मोठा धक्का दिला. त्यांनी पक्षाच्या दोन कार्याध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. हे दोघे होते प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे, अजित पवारांबद्दल प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, अजित विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

2 जुलै 2023 रोजी अजित दादांचा बंड, थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

10 जून रोजी राष्ट्रवादीच्या बैठकीपासून अजित पवार शांत होते. यादरम्यान अनेकवेळा ते भाजपच्या नेत्यांना भेटत असल्याच्या बातम्या आल्या, मात्र ते फेटाळत राहिले. रविवारी (2 जुलै) घडलेल्या घटना इतक्या झपाट्याने घडल्या की कुणाला सुगावाही लागला नाही, अजित पवार यांनी आधी त्यांच्या समर्थक आमदारांची घरी बैठक घेतली आणि नंतर राजभवनाकडे रवाना झाले. त्यानंतर अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले. राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात केवळ अजित पवारांनीच शपथ घेतली नाही, तर राष्ट्रवादीचे आणखी आठ नेते मंत्री झाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT