शरद पवारांना दिवाळीत ‘झटका’! बडा नेता अजित पवारांकडे जाणार, कॅबिनेटमंत्र्याचा दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar will face big blow in diwali big leader will go ajit pawar claims cabinet minister
sharad pawar will face big blow in diwali big leader will go ajit pawar claims cabinet minister
social share
google news

Shambhuraj Desai: राज्यातील राजकारणाता प्रचंड मोठ्या गतीने बदल घडत असून वेगवेगळ्या पक्षातील नेते आता मोठ मोठे गौप्सस्फोट करत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं आता काय घडणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर आता आणि पितृ पक्षातील 15 दिवस संपल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार (Expansion of the State Cabinet) होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

ADVERTISEMENT

राजकीय घडामोडी

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री (Chief Minister) पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर राजकीय बदलांना वेग आला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून वेगळी चूल मांडत अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेते पदावर असतानाही त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेसचेही (Nationalist Congress Party) दोन गट पडले. या बदलत्या राजकारणामुळेच नवनव्या घटना घडामोडींनी वेग आला आहे.

हे ही वाचा >> Samruddhi Accident :…तर 12 जणांचे वाचले असते प्राण; RTO अधिकाऱ्यांसह तिघांना अटक

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार

राज्यात हे सगळे बदल होत असतानाच राज्यात मोठा राजकीय धमाका होणार असल्याची शक्यता आहे का असं विचारताच उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट करत लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तोही गौप्यस्फोट

तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अनेक नेत्यांच्या सरकार सोबत येण्याची चर्चा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या गोष्टीमुळेच आता कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागत असावा असा गौप्यस्फोटही शंभुराज देसाई यांनी केला आहे.

हे ही वाचा >> ‘ज्यांनी बाळासाहेबांना आयुष्यभर…’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

नेता शरद पवार गटाचा

शंभूराज देसाई यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल असं सांगत दसरा दिवाळीत नेहमी मोठे धमाके होतच असतात मात्र यावेळी मोठा धमाका होईल असा गौफ्यस्फोट शंभुराज देसाई यांनी केला आहे. यामुळं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा कोण मोठा नेता शिंदे-फडणवीस सरकार सोबत जाणार हे पाहावं लागणार आहे. यावेळी जयंत पाटील सरकार सोबत जातील अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT