Maval Lok Sabha : ‘महायुतीचा उमेदवार मीच’, जागावाटपा आधीच शिंदेंच्या खासदाराने केली घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shiv Sena-BJP MP Srirang Barane announced that he is the candidate for Maval Lok Sabha constituency
Shiv Sena-BJP MP Srirang Barane announced that he is the candidate for Maval Lok Sabha constituency
social share
google news

Mawal Loksabha : सध्या राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठीही प्रत्येक पक्षाकडून जय्यत तयारी केली जात आहे. त्यातच राज्यात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) दोन गट पडल्याने लोकसभा आणि विधानसभेच्या तिकिटांचा हा तिढा आणखी वाढला आहे. मावळ लोकसभा मतदार संघाचाही असाच तिढा वाढल्याने या मतदार संघाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. मात्र विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (MP Srirang Barane) यांनी तिढा असल्याचे चित्र जरी उभा केलं जात असलं तरी मावळ मतदार संघात गेल्या दहा वर्षापासून मी केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या रिंगणातही महायुतीचा म्हणून भाजपकडून मीच उमेदवार असणार आहे, आणि या मतदार संघातून मीच निवडून येऊन हॅटट्रीकही मीच करणार असल्याचे त्यांनी विरोधकांसह मित्र पक्षातील नेत्यांनाही इशाराच दिला आहे.

ADVERTISEMENT

कामाला सुरुवात

खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, महायुतीचा उमेदवार म्हणून भाजप आणि शिवसेना एकत्र निर्णय घेत आहेत. त्यामुळे मावळ मतदार संघामध्ये श्रीरंग बारणे हेच उमेदवार असतील हे मात्र नक्की असल्याचेही त्यांनी सांगितले. कारण मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मावळ मतदार संघामध्ये तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा अशाही सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा >> ज्या मुलांना आईसारखी माया दिली, त्यांनीच केला घात, वडिलांची निर्घृण हत्या

उमेदवारीवरून सामना रंगणार

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी ज्या पक्षाचा सरपंच आणि नगरसेवकही नसेल तर त्या पक्षाला उमेदवारी का द्यायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता महायुतीतच मावळच्या उमेदवारीवरून सामना रंगणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी महायुतीकडून आपली उमेदवारी जाहीरही करून टाकली आहे. त्यामुळे आता अजित पवार गट याबाबत काय निर्णय घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शंभर टक्के हॅटट्रिक

मावळ लोकसभा मतदार संघात उमेदवारीबाबत रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र फक्त माध्यमांनीच रंगवले असल्याचे बारणे यांनी म्हटले आहे. ही रस्सीखेच असल्याचे सांगितले जात असले तरी महायुतीचा उमेदवार मीच असेल असं शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केले आहे. 2024 च्या निवडणुकीत मावळ लोकसभेचा महायुतीचा उमेदवार मीच असेल आणि शंभर टक्के हॅटट्रिकही करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.

दादा गट अडचणीत

खासदार श्रीरंग बारणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही खळबळ उडाली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके यांनीही हा मतदार संघ अजित पवार गटाचा असल्याचे सांगत मावळवर त्यांनीही हक्का सांगितला आहे. खासदार बारणे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा दाखला दिलामुळे आता ज्या राष्ट्रवादी याबाबत काय निर्णय घेणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Crime : गन पॉईंटवर केलं नग्न, बलात्कार करून…, विद्यार्थीनींसोबत काय घडलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT