“राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, देवेंद्र फडणवीसांना इशारा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

politics of maharashtra : Shiv sena claims that eknath shinde popularity more than devendra fadnavis as chief minister
politics of maharashtra : Shiv sena claims that eknath shinde popularity more than devendra fadnavis as chief minister
social share
google news

Maharashtra Politics News : युती करून वर्ष होण्याआधीच भाजप-शिवसेनेतील संबंध कमालीचे ताणले गेल्याचे चित्र राज्यात दिसू लागलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्व आलबेल असल्याचे दावे केले जात असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, अशा मथळ्याखाली देण्यात आलेल्या या जाहिरातीतून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच इशारा दिला गेला असल्याचा सूर राजकीय वर्तुळातून उमटला आहे.

ADVERTISEMENT

मोदी-शिंदे जोडी… फडणवीस गायब!

शिवसेनेची एक जाहिरात मराठी, हिंदी, इंग्रजी भाषिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. जाहिरातीत म्हटले आहे की, “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्टात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे.”

पुढे म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.”

हे वाचलं का?

हेही वाचा >> Eknath Shinde : ‘शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना काढा’, हायकमांडचा CM शिंदेंना आदेश, ‘ते’ मंत्री कोण?

“सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल. म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.”

शिवसेनेने असाही दावा केला आहे की, “मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली आहे”, असा मजकूर या जाहिरातीत आहे.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांना इशारा?

राज्यात सत्ताधारी भाजप-शिवसेनेतच कुरघोड्या सुरू आहेत. भाजपने कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा करून एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच घेरण्याचा प्रयत्न केला आहे, असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे राज्यातील इतर जागांवरही स्थानिक भाजपचे नेते दावा करत आहेत. त्यामुळे भाजप जागावाटपाआधी शिवसेनेविरोधात दबाबतंत्र वापरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपचा कल्याणबरोबर ठाणे लोकसभेवरही दावा! CM एकनाथ शिंदेंवर दबाव?

एकीकडे भाजपकडून वेगवेगळ्या जागांवर दावा केला जात असतानाच शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीने भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष समोर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे यातून शिवसेनेने फडणवीसांना इशारा दिला असल्याचेही म्हटलं जात आहे. 2024 नंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नावर भाजपचे नेते बोलणं टाळताना दिसत आहे, असं असताना शिवसेनेने सर्वेक्षणाचा दाखला देत अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला आहे.

हेही वाचा >> “शरद पवारांना जे साधायचे ते त्यांनी साधलेच”, शिवसेनेचे (UBT) थेट भाष्य

भविष्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना जास्त लोकांची पसंती असून, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून कमी लोकांची पसंती असल्याचे शिवसेनेने अधोरेखित केले आहे. त्यामुळे युतीतील प्रमुख पक्षातच वर्चस्वसाठी लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे.

फडणवीसांना डिवचलं?

2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार अस्तित्वात आले. महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हा ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा भाजपकडून देण्यात आली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हे घोषवाक्य चर्चेत राहिले. पण, आता शिवसेनेने त्याच घोषणेत बदल करून राज्यात शिंदेंच म्हणत फडणवीसांना डिवटलं आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT