Shiv Sena MLAs case : शिंदे अपात्र झाल्यास भाजपचा प्लॅन बी काय? समजून घ्या 4 मुद्द्यांत

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

shiv sena mlas disqualification case assembly speaker : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतायेत. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यायचा आहे. नार्वेकरांनी कारवाई सुरु केली परंतु त्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने केला जात होता. त्यातच ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात कशा पद्धतीने अध्यक्ष कार्यवाही करणार आहेत याचं वेळापत्रक सादर करण्यास सांगितलं. त्याचबरोबर ही हे प्रकरण अनिश्चित काळापर्यंत चालू ठेवता येणार नाही, असं देखील न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे.

ADVERTISEMENT

पक्षांतर बंदी कायदा व संविधानातील 10 व्या परिशिष्टानुसार एकनाथ शिंदे आणि शिवेसनेचे 16 आमदार अपात्र झाल्यास भाजपकडे कुठला प्लॅन बी असेल हेच आपण समजावून घेऊयात चार मुद्द्यांमध्ये…

पहिला मुद्दा : अजित पवार मुख्यमंत्री होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर सातत्याने अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा होताहेत. मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजित पवारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलून दाखवली होती. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणारे फ्लेक्स जागोजागी लावले होते.

हे वाचलं का?

हेही वाचा >> महिला आरक्षण विधेयकाला AIMIM चा विरोध का? असदुद्दीन ओवेसींनी सांगितलं कारण

संजय राऊत यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी भाजपसोबत गेल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सातत्याने सुरु आहे. त्यामुळे जर एकनाथ शिंदे अपात्र झाले तर अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं.

दुसरा मुद्दा : देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटलांना संधी?

शिंदे अपात्र झाले, तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. ठाकरेंचं सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. पंरतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. दुसरीकडे विरोधकांकडून फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या वाक्याची त्यांना सातत्याने आठवण करुन दिली जात होती.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> जुन्या संसदेतील सरकारं हादरवून टाकणारे ऐतिहासिक किस्से! तुम्हाला किती माहितीये?

भाजपचे आमदार तसेच कार्यकर्ते हे देखील फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करत होते. दुसरीकडे चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमामध्ये ‘आम्ही मनावर दगड ठेवून शिंदेना मुख्यमंत्री केलं’ असल्याचं म्हटले होते. शिवसेना फुटीचं खापर भाजपवर फुटू नये यासाठी त्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे आता शिंदे अपात्र झाले तर फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं. दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव देखील चर्चेत आहे. विखे पाटलांना देखील मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं.

ADVERTISEMENT

तिसरा मुद्दा : राहुल नार्वेकर अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ शकतात

अपात्रतेचा निर्णय हा राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. नार्वेकरांना अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या विरोधात निकाल दिल्यास ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे. अशावेळी राहुल नार्वेकर अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ शकतात.

हेही वाचा >> Sanjay Raut : गटारं, अंधभक्त, नेहरू… PM मोदींना डिवचलं; राऊत असं काय बोलले?

असं झालं तर नव्या अध्यक्षांची नेमणूक करण्यामध्ये कालावधी जाईल, त्याचबरोबर नवा अध्यक्ष नेमल्यास त्या अध्यक्षासमोर सुनावणी होण्यास वेळ लागेल आणि तोपर्यंत 2024 च्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. निवडणुका लागल्यास विधानसभा विसर्जित होईल. त्यामुळे हा देखील पर्याय भाजपकडून आखला जाऊ शकतो.

चौथा मुद्दा : निवडणुका होऊ शकतात

गेल्या अनेक दिवसांपासून मुदतपूर्व निवडणुकांची चर्चा होतीये. दुसरीकडे एक देश एक निवडणूक याबाबतच विधेयक संसदेत आणलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाने जरी अध्यक्षांना कारवाईचं टाईमटेबल तयार करण्यास सांगितलं असलं तरी आमदारांच्या अपात्रतेची कारवाई अध्यक्षांनाच करावी लागणार असल्याने त्यात न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही.

अशावेळी ही प्रक्रीया लांबवली जाण्याची शक्यता आहे. अशातच मुदतीपूर्वी निवडणुका जाहीर करण्यात आल्या तर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा मागे पडेल. त्यामुळे जर एकनाथ शिंदे अपात्र झाले तर या चार ऑप्शन भाजपकडून पत्करले जाऊ शकतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT