MLA Disqualification : ‘ही पद्धत पक्षपाती”, ठाकरे गटाचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

विद्या

ADVERTISEMENT

Maharashtra speaker Rahul Narvekar had begun the cross examination of UBT MLAs on November 21.
Maharashtra speaker Rahul Narvekar had begun the cross examination of UBT MLAs on November 21.
social share
google news

MLAs Disqualification Case : सुप्रीम कोर्टाने ३१ डिसेंबरची डेडलाईन दिल्यानंतर शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरील सुनावणीला वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरच गंभीर आरोप केला आहे. पूर्वग्रहामुळे विधानसभा अध्यक्ष अवलंबत असलेली पद्धत पक्षपाती आहे, असा थेट आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. (Shiv sena (UBT) accuses Maharashtra assembly speaker of adopting unfair procedure)

ADVERTISEMENT

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांकडे लेखी आक्षेप नोंदवला आहे. आपली उलटतपासणी सुरू असतानाही शिंदे गटाकडून कोणतेही पुरावे प्रतिज्ञापत्र मिळालेले नसल्याचे त्यांनी दोन पानी पत्रात नमूद केलं आहे. विधानसभेत अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी अधिक वेळ दिला होता, पण यामुळे आमचे नुकसान होत आहे आणि अध्यक्षांची ही पद्धती पक्षपातीपणाची आहे, असं या पत्रात म्हटलेलं आहे.

सुनील प्रभूंची विधानसभा अध्यक्षांबद्दल तक्रार काय?

प्रभू यांनी पत्रात म्हटले आहे की, 2 नोव्हेंबर 2023 रोजी पारित केलेल्या आदेशाद्वारे, अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत साक्षीदारांची यादी आणि पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची परवानगी दिली होती. हे प्रकरण 21 नोव्हेंबर रोजी उलटतपासणीसाठी निश्चित करण्यात आले होते. आम्ही (ठाकरे गट) आमच्या साक्षीदारांची यादी आणि साक्षीदाराच्या पुराव्यासाठी मुख्य प्रतिज्ञापत्र 18 नोव्हेंबर रोजी दाखल केले. एका साक्षीदाराचे प्रतिज्ञापत्र 19 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते, कारण साक्षीदाराला पुणे ते मुंबई असा प्रवास करावा लागला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> ‘ठाकरेंचा ‘तो’ व्हिप बोगस, खोटा..’, शिंदेंच्या वकिलांचा खळबळजनक आरोप

पत्रात पुढे म्हटलं आहे की, “तथापि, प्रतिवादी (शिंदे सेना) गटाने केवळ त्यांच्या साक्षीदारांची यादीच दाखल केली, पण पुराव्यांसह प्रतिज्ञापत्र दाखल केलेच नाही. इतकंच नाही तर वेळ वाढवून मागणारा कोणताही अर्ज त्यांच्याकडून किंवा त्यांच्या वकिलांकडून सादर करण्यात आलेला नाही,” असे प्रभू यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

सुनावणी वेळी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर काय म्हणाले?

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, शिंदे गटाकडून पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागणारा अर्ज आला होता आणि त्यांनी त्याला परवानगी दिली होती. प्रभू यांच्या वकिलांनी मंगळवारी (21 नोव्हेंबर) वेळ वाढवून देण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘त्या’ व्हीपवरून तुफान वाद, प्रभू-जेठमलानी भिडले, वाचा सुनावणी जशीच्या तशी

पत्रात म्हटलेलं आहे की, “अशा परिस्थितीत. पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यासाठी प्रतिवादी गटाच्या अर्जासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी अवलंबलेल्या कार्यपद्धतीवर मी याद्वारे माझा तीव्र आक्षेप नोंदवत आहे. अवलंबलेली प्रक्रिया अन्याय करणारी आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारी आहे. हे याचिकाकर्त्या गटाला प्रतिकूल परिस्थितीत ठेवते. साक्षीदाराचे पुरावे आधीच दाखल झाले आहेत आणि उलटतपासणीही सुरू झाली आहे,” असे प्रभू यांनी या पत्रात म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ठाकरे गटाने दिलेले ‘ते’ 23 पुरावे, जसेच्या तसे, ‘त्या’ आमदारांचं काय होणार?

दोन पानांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, “पक्षपाती कार्यपद्धतीचा अवलंब केल्याने एक हास्यास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे आणि यामुळे याचिकाकर्त्या गटावर पूर्वग्रह दूषितपणातून गंभीर परिणाम होत आहे”, असे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT