'पेनड्राईव्ह दिल्यापासून 500 लोक कोमात गेलेत..', सुरेश धसांच्या 'त्या' पेनड्राईव्हमध्ये आहे तरी काय?

मुंबई तक

Suresh Dhas Pendrive: बीडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली. ज्यानंतर मीडियाशी बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी एक मोठं विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

सुरेश धसांच्या 'त्या' पेनड्राईव्हमध्ये आहे तरी काय?
सुरेश धसांच्या 'त्या' पेनड्राईव्हमध्ये आहे तरी काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठकीत काय घडलं?

point

सुरेश धस आणि धनंजय मुंडे बैठकीत नेमकं काय बोलले

point

सुरेश यांनी अजित पवारांसमोर केले काही गंभीर आरोप

बीड: 'बोगस कामांचे 78 कोटी रुपये हे उचलण्यात आले आणि त्यात काही पैसे हे DPDC चे आहेत. त्यासंबंधी मी एक पेनड्राईव्ह हा काल (29 जानेवारी) अजितदादांच्या पीएना दिला आहे. मी काल स्टेटमेंट केल्यापासून जवळजवळ 500 लोकं कोमात गेले आहेत.' असं विधान करत भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळ उडवून दिली आहे. 

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (30 जानेवारी) बीडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. ज्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार आणि खासदार होते. विशेष बाब म्हणजे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे हेही या बैठकीत उपस्थित होते.

हे ही वाचा>> Raj Thackeray : "अजित पवार ते हेमंत बिस्वा शर्मा... भाजपने ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच मंत्री केलं"

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत काही विषयांवरून वाद झाल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी एक मोठं विधान केलं आहे. पाहा पत्रकार परिषदेत ते नेमकं काय म्हणाले.

'तेव्हापासून 500 लोकं कोमात गेलेत...', सुरेश धसांना कोणाला हाणला टोला?

'आष्टीमध्ये जनावरांच्या बाबतीतील एक्स रे मशीन आणि पोट तपासायचं मशीन याला 50 लाख रुपये द्यायचा निर्णय झाला. बाक जे काही बोगस कामांचे बिलं उचलली होती त्याबाबतीत मुद्दा उपस्थित केल्यावर अजितदादांनी सांगितलं की, लेखी पत्र द्या. मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहेत. परंतु या जिल्ह्यात 73 कोटी बोगस उचलल्याचं मी जाहीर केलं आहे.' 

'मी आतापर्यंत त्याची लेखी तक्रार केली नव्हती. पण आता मी त्याची लेखी तक्रार करेन. हे सोप्पं नाही ना.. स्वतंत्र कमिटी नेमली जाईल.' 

'बैठकीत बाचाबाची हा किरकोळ विषय आहे तो. एवढं तेवढं होत असतं. मीडियामध्ये यावं एवढं काही झालेलं नाही बैठकीत. बिंदू नामावलीचा मुद्दा अजूनही कायम आहे. तो मुद्दा आजही मी बोललोय.'

हे ही वाचा>> Suresh Dhas : अजित पवार यांच्यासमोर सुरेश धसांनी DPDC बैठकीत थेट करूणा मुंडेंचं नाव घेतल?

'जे लोकं करूणा मुंडेंच्या गाडीत बंदूक ठेवतात, साड्या नेसतात.. काही एक पठ्ठ्या 15-15 जेसीबी.. आणि बीडमधील काही पोलीस त्यांच्या स्वत:च्या हायवा.. आणि इथे कलेक्टर ऑफिसला लावलेल्या हायवा काढून नेतात पोलीस.' 

'माझं म्हणणं की,  पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे. परळीत जे काही पोलीस दल जे चुकीचे वागले आहेत त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा, गुंडांच्या टोळ्या काढाव्यात किंवा अजून काही झंटा-फंटा काय करायचं ते करावं.' 

'मी अजितदादांच्या पीएना दिला पेनड्राईव्ह.. आज होते ना पीए बरोबर अजितदादांच्या.. त्यांना कालच पाठवलं आहे पेनड्राईव्ह. फक्त पेन ड्राईव्ह देऊन काही होईल का? याची लेखी तक्रार होईल. यावर राज्याचे सचिव किंवा उप सचिव दर्जाचा अधिकारी नेमला जाईल. तो नेमल्यानंतर ते जाऊन पाहतील.' 

'78 कोटी रुपये जे बोगस उचलले आहेत त्यापैकी काही DPDC चे आहेत. मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून जवळजवळ 500 लोकं कोमात गेलेले आहेत.' असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा टार्गेट केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp