Aaditya Thackeray: "वामन म्हात्रेंना..."; बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून आदित्य ठाकरे संतापले
Aaditya Thackeray On Waman Mhatre : आदित्य ठाकरे छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये राडा झाला. दोन्ही गटातील कार्यकर्ते आमने-सामने आल्यानं हाणामारी झाली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बदलापूर अत्याचार प्रकरणावर आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
वामन म्हात्रेंवर टीका करत आदित्य ठाकरे काय म्हणाले?
संभाजीनगरमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा का झाला?
Aaditya Thackeray On Waman Mhatre : शिवसेना (UBT) चे नेते आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये राडा झाला. दोन्ही गटातील कार्यकर्ते आमने-सामने आल्यानं हाणामारी झाली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (Aditya Thackeray visits to Chhatrapati Sambhaji Nagar, there was an altercation between Thackeray group activists and BJP leaders. The activists of both the groups came face to face and a scuffle ensued. So the police had to resort to mild lathicharge. In this background, Aditya Thackeray has given a big reaction)
ADVERTISEMENT
"बदलापूरच्या घटना पाहता वामन म्हात्रेंना पक्षातून का काढलं नाही? वामन म्हात्रे कोण आहेत? त्यांनी तर एका पत्रकाराला विचारलं की तुझ्यावर रेप झाल्यासारखं का विचारतेस आम्हाला? तसच किसन कथोरेंवर कारवाई का झाली नाही? तसच घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनीही हेच सांगितलं की हे सर्व राजकीय होतं. जेव्हा नागरिक आंदोलन करायला रस्त्यावर येतात. तेव्हा तुम्ही त्यांना राजकीय बोलता. ज्यांच्यावर लाठीचार्ज केला त्यांना तुम्ही अटक करता. पण ज्याने बलात्कार केला, त्याच्यावर एफआयआर घेण्यासाठी तुम्हाला दहा दिवस लागले. गरोदर महिलेला तिथे दहा तास बसवलं. आम्ही त्याविरोधात आंदोलन करत आहोत, असं म्हणत शिवेसना ठाकरे गटाचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
हे ही वाचा >> Vasantrao Chavan Passed Away: महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का! खासदार वसंत चव्हाण यांचं निधन
पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
"काल शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आंदोलन केलं. त्यामुळे माझ्याविरुद्ध किंवा पक्षाच्या विरुद्ध हे आंदोलन केलं आहे. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं. पण यात फरक हाच होता की, ते प्रधानमंत्री आहेत. त्यांच्याकडे जबाबदारी आहे. जो शक्ती कायदा आहे, जो आम्ही महराष्ट्रात पारित करून केंद्राकडे पाठवला आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची अशी परिस्थिती आहे की, कोयता गँगने एका पीएसआयवर हल्ला केला आहे. मग महाराष्ट्रात सत्ता कुणाची आहे? आमच्या अडीच वर्षांच्या काळात हे घडलं नाही. पण आता पोलिसांवर हल्ले सुरु आहेत. महिलांवर अत्याचार वाढायला लागले आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> UPS Calculation: ६०,७०,८० हजार बेसिक सॅलरी मिळतेय? तर किती मिळणार पेन्शन? UPS चं गणित समजून घ्या
बदलापूरच्या घटना पाहता वामन म्हात्रेंना पक्षातून का काढलं नाही? वामन म्हात्रे कोण आहेत? त्यांनी तर एका पत्रकाराला विचारलं की तुझ्यावर रेप झाल्यासारखं का विचारतेस आम्हाला? तसच किसन कथोरेंवर कारवाई का झाली नाही? तसच घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनीही हेच सांगितलं की हे सर्व राजकीय होतं. जेव्हा नागरिक आंदोलन करायला रस्त्यावर येतात. तेव्हा तुम्ही त्यांना राजकीय बोलता. ज्यांच्यावर लाडीचार्ज केला त्यांना तुम्ही अटक करता. पण ज्याने बलात्कार केला, त्याच्यावर एफआयआर घेण्यासाठी तुम्हाला दहा दिवस लागले. गरोदर महिलेला तिथे दहा तास बसवलं. आम्ही त्याविरोधात आंदोलन करत आहोत."
ADVERTISEMENT