Aditya Thackeray : ''आणि म्हणून...आणि म्हणून...'', आदित्य ठाकरेंनी केली CM शिंदेंची मिमिक्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

 aditya thackeray mimicked cm eknath shinde on udhhav thackeray dasara melava shiv sena ubt maharashtra politics
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मिंधे सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढले

point

महाराष्ट्राच्या या लुटीविरुद्ध आपल्याला लढायचे आहे

point

महाराष्ट्र अदानींच्या घशात घालू द्यायचा नाही

Aditya Thackeray on Eknath Shinde, Dasara Melava : ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली आहे. 'आणि म्हणून....आणि म्हणून आज किती वेळा म्हणणार आहेत काही माहिती, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेची मिमिक्री केली आहे. तसेच असे म्हणत म्हणत खोके सरकार महाराष्ट्रात खोकेच्या खोके काढत आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर केला आहे. (aditya thackeray mimicked cm eknath shinde on udhhav thackeray dasara melava shiv sena ubt maharashtra politics) 

ADVERTISEMENT

ठाकरे गटाच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. ''कोणाची तरी भाषण एकलेलं मी...आणि म्हणून....आणि म्हणून आज किती वेळा म्हणणार आहेत काही माहिती. पण असे म्हणत म्हणत खोके सरकार महाराष्ट्रात खोकेच्या खोके काढत आहे. मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील त्यांनी 6 हजार कोटीचा रस्त्याच्या घोटाळा केला आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी शिंदेवर केला आहे. 

हे ही वाचा : Sushama Andhare : ''सरसंघचालक साहेब देवेंद्रजींचे कान उपटा'', दसरा मेळाव्यात अंधारे कडाडल्या!

हे ही वाचा : दसरा मेळाव्याआधीच राडा! ठाकरे-शिंदेंचे कार्यकर्ते आमने सामने; कल्याणमध्ये काय घडलं?

या खोके आणि मिंधे सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, महाराष्ट्राच्या या लुटीविरुद्ध आपल्याला लढायचे आहे. हा महाराष्ट्र अदानी आणि सत्ताधारी आघाडीच्या लाडले कंपनीला द्यायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. 

हे वाचलं का?

मी मुंबई महापालिका आयुक्तांना इशारा देत आहे की त्यांनी यापुढे रस्त्यांच्या करारावर सह्या केल्यास ते तुरुंगात जातील. कारण येत्या एक महिन्यात आम्ही सत्तेत येत आहोत असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. आमच्या कार्यकाळात दावोसमधून 80 हजार कोटींची गुंतवणूक झाली. मात्र शिंदे सरकारने केवळ दोन दिवसांच्या दावोस दौऱ्यात 40 ते 45 कोटी खर्च केले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर केली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT