शरद पवार आणि PM मोदींच्या भेटीनंतर होणार सगळ्यात मोठा राजकीय धमाका? | Opinion

मुंबई तक

ADVERTISEMENT

शरद पवार आणि PM मोदींची भेट
शरद पवार आणि PM मोदींची भेट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट

point

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा

point

शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य असलेले शरद पवार यांच्याकडे विरोधक किंवा सत्ताधारी पक्ष हे अजिबात दुर्लक्ष करत नाहीत. अलीकडेपर्यंत अनेकदा नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधणारे पवार बुधवारी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी संसदेत पोहोचले. महाराष्ट्रातील काही शेतकरीही त्यांच्यासोबत होते. काही दिवसांपूर्वीच पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून फेब्रुवारीमध्ये  राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर होणाऱ्या 98व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, या भेटीचा उद्देश हा केवळ साहित्य संमेलनाचा नव्हता. कारण खुद्द शरद पवारांनी हे मान्य केले आहे. 

ADVERTISEMENT

सातारा आणि फलटणच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना डाळिंब भेट दिले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले असले तरी ही गोष्ट राजकीय लोकांच्या पचनी पडलेली नाही. साहजिकच अनेक प्रकारचे अंदाज लावणं सुरू झाले आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी अचानक घेतली CM फडणवीसांची भेट... शिंदेंना शह?

1-मोदींना शरद पवारांची साथ हवी?

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे (शरद पवार) सध्या १० आमदार आणि सुमारे ८ खासदार आहेत. केंद्र सरकारला ज्या प्रकारे आपली अनेक विधेयके संसदेत मंजूर करून घ्यायची आहेत, त्यासाठी शरद पवार यांच्यासारख्या लोकांची नितांत गरज असेल. मात्र, शरद पवार यांच्या पक्षाने यापूर्वी एक देश, एक निवडणूक या मुद्द्यावर पाठिंबा देण्यास नकार दिला होता. मात्र या बैठकीनंतर कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शरद पवार केंद्राच्या या विधेयकाला पाठिंबा देण्यास तयार होण्याची शक्यता आहे. यासोबतच शरद पवार इतर विरोधी पक्षांनाही केंद्राला पाठिंबा देण्यासाठी राजी करू शकतात.

2-शेतकऱ्यांचे आंदोलन संपवण्यासाठी मोदींना पवारांची मदत हवी?

बुधवारी जेव्हा शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत होते तेव्हा महाराष्ट्रातील शेतकरीही त्यांच्यासोबत होते. पंजाबमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनत चालला आहे. दिवसेंदिवस शेतकरी आंदोलन वाढवत आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारच्या अनेक ज्येष्ठ लोकांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र तोडगा काही निघालेला नाही.

हे ही वाचा>> Ajit Pawar: अजितदादा अस्वस्थ... अधिवेशन सोडून तडकाफडकी गेले दिल्लीला, घडलं तरी काय?

शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी शरद पवार यांनी मध्यममार्ग काढावा, अशी मोदी सरकारची इच्छा आहे. खरे तर पवार हे देशाचे कृषीमंत्रीही राहिले असून त्यांचे अनेक शेतकरी संघटनांशी चांगले संबंध आहेत. यासोबतच त्यांची मते विरोधी पक्षातही विचारात घेतली जातात. पवार यांनी केवळ पंतप्रधान मोदींचीच भेट घेतली नाही तर ते जगदीप धनखड यांनाही भेटायला गेले. 

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्यांच्या सभेत धनखड हे शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत गेले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत वचन दिलं होतं. शेतकरी आंदोलन ज्या प्रकारे सरकारच्या हाताबाहेर गेले आहे, ते पाहता आता शरद पवारांसारखे नेतेच हे आंदोलन व्यवस्थितरित्या हाताळू शकतात. शेतकऱ्यांवर बळाचा वापर करून हे काम कधीही होणार नाही. मोदी सरकारला हे फार पूर्वीपासून माहीत आहे.

ADVERTISEMENT

3-अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचीही रणनीती

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्रात  फडणवीस सरकारमध्ये दिग्गज नेते बसले आहेत. हे दोन्ही भविष्यात अधिक प्रभावी झाल्यास त्यामुळे भाजपला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भाजपकडे सध्या 132 जागा आहेत. महाराष्ट्रात सरकार चालवण्यासाठी 145 आमदारांची गरज आहे. शरद पवार यांच्याकडे सध्या फक्त 10 आमदार आहेत. हा आकडा भाजपला बहुमत मिळवून देण्याच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे भाजपने शरद पवारांशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे बनले आहे. शरद पवार यांच्याशी चांगले संबंध ठेवल्यास सरकारमधील दोन्ही मित्र पक्षही नियंत्रणात राहू शकतात.

4- इंडिया आघाडीत तेढ निर्माण करण्याचे काम

सरकार सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षात नेहमी फूट पडणे अत्यंत गरजेचे असते. उदाहरणार्थ, हिवाळी अधिवेशनातच समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस इत्यादींनी इंडिया आघाडीतील अदानी मुद्द्यावरून काँग्रेसपासून दुरावलं आहे. विरोधी पक्ष जेवढा कमकुवत राहील, तेवढं अल्पमतातील मोदी सरकार सुरळीतपणे चालवत राहील. शरद पवारांना सोबत घेऊन भाजप इंडिया आघाडीतही तेढ निर्माण करू शकते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT