Ajit Pawar: 'माझ्या भाषेत सांगायचं तर सा&*X काढून टाकलं पाहिजे...' भर सभेत अजितदादा काय बोलले?
Ajit Pawar On Badlapur School Rape Case : विकृत माणसं जेव्हा आमच्या आया-बहिणींवर हात टाकतात, त्यावेळी त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर अशा विकृतांचे सा&*X काढून टाकलं पाहिजे", असं अजित पवार म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विकृत माणसांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे
विकृतांचे सा&*X काढून टाकलं पाहिजे
बदलापूरच्या घटनेवर अजित पवारांचा संताप
Ajit Pawar On Badlapur School Rape Case : बदलापूरमधील शाळेत दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने काळ्या फिती आणि काळे झेंडे हाती घेऊन आंदोलन केले होते. यानंतर या घटनेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या भाषेत सांगायचं तर सा&*X काढून टाकलं पाहिजे...', असा संताप अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला आहे. (ajit pawar aggresive reaction on badlapur school rape case yavatmal ladaki bahin yojana program)
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आज यवतमाळच्या किन्हीमध्ये पार पडला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी बदलापूरच्या घटनेवर संताप व्यक्त केला. 'आम्ही कडक शासन करणार आहोत. आमचा शक्ती कायद्यासाठी प्रयत्न सुरु आहे, राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी गेलाय. अशा प्रकारची विकृत माणसं जेव्हा आमच्या आया-बहिणींवर हात टाकतात, त्यावेळी त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर अशा विकृतांचे सा&*X काढून टाकलं पाहिजे", असं अजित पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Yavatmal News : शिंदेंच्या भाषणा दरम्यान 'लाडक्या बहिणीं'नी घातला गोंधळ, नेमकं काय घडलं?
"काही नराधम आणि विकृत माणसं काही गोष्टी करतात. त्याला लाडकी बहीण योजनेशी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात. माझी विरोधकांना पण विनंती आहे. वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या. मी कोणत्याही घटनेचं समर्थन करणारा नाही. जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे. तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या. त्याची फिकीर आम्ही करणार नाही, असे देखील अजित पवार यांनी सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अजित पवार पुढे म्हणाले की, लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आतापर्यंत सव्वा कोटी मायमाऊलींच्या बँक खात्यात दोन महिन्यांची रक्कम जमा झाली आहे. याव्यतिरिक्त मुलींच्या उच्च शिक्षणाचा 100 टक्के खर्च सरकार उचलणार आहे. 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत आम्ही देत आहोत. त्याचप्रमाणे माझ्या शेतकरी बांधवांना वीजबिल माफ केलं आहे. बारावी आणि पदवीधर तरुणांना प्रशिक्षण भत्ता सुद्धा आम्ही देत आहोत. अशा अनेक योजना आम्ही राबवत असून त्या पुढेही चालू राहाव्यात यासाठी महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही निवडून देणं अतिशय गरजेचं असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : Bigg Boss Marathi 5: वाट्टेल ते बोलणाऱ्या जान्हवी किल्लेकरचा करेक्ट कार्यक्रमच झालाय, बिग बॉसच्या घरातून...
ADVERTISEMENT