Ajit Pawar: अजितदादांच्या आईने पांडुरंगाकडे केली 'ही' मागणी, थेट विठुरायाला घातलं साकडं!
Ajit Pawar Mother: अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील दुरावा कमी होऊन पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र यावं यासाठी अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घातलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अजितदादांच्या आईने घेतलं विठ्ठलाचं दर्शन

पंढपुराच्या मंदिरात दानपेटीत टाकले पैशाचे दोन बंडल

अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्यासाठी अजितदादांच्या आईचं पांडुरंगाला साकडं
पंढरपूर: अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्रित यावेत यासाठी आपण आज विठुरायाला साकडे घातल्याचे अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी सांगितले. आज (1 जानेवारी) नवीन वर्षाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. (ajit pawar and sharad pawar should come together ajitdada mother ashatai pawar has prayed to vitthal in pandharpur)
आशाताईंनी दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पवार कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा पवार कुटुंब गुण्यागोविंदाने नांदावे. असे आपण विठुरायाकडे साकडे घातले असल्याचे यावेळी सांगितले.
हे ही वाचा>>Raj Thackeray : "विधानसभेत काय घडलं यावर माझं...", नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरेंची पोस्ट
'नवीन वर्ष सर्वांना आनंदाचे आणि शांततेचे जावो, सर्व कौटुंबिक कलह संपुष्टात येवोत आणि दादाच्या (अजित पवार) मागे असलेली सर्व संकट संपून जावीत. तसंच पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येवोत. ही प्रार्थना विठ्ठलाला केली.' असं आशाताई पवार यावेळी म्हणाल्या.
अजित दादांच्या आईने दान पेटीत टाकले पैशाचे दोन बंडल
दरम्यान, नववर्षाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी पंढरपुरात येऊन विठुरायाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी दान पेटीत भरघोस असं दान टाकलं. यावेळी त्यांनी पैशाची दोन भली मोठी बंडलं ही दानपेटीत टाकली.
हे ही वाचा>> 1st January 2025 Horoscope In Marathi: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पडणार पैशांचा पाऊस! 'या' राशीचे लोक होतील मालामाल
आशाताई या अनेकदा पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. त्या प्रमाणेच आजही त्यांनी नववर्षानिमित्त पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी थेट पंढरपूर गाठलं. ज्यानंतर त्यांनी मनोभावे विठ्ठलाची पूजा-अर्चा केली.
निवडणूक अन् पवार कुटुंबात फूट
मागील अनेक वर्ष पवार कुटुंब हे एकसंध होतं. मात्र, 2023 साली अजित पवारांनी 40 आमदारांना सोबत घेत थेट भाजपसोबत सत्तेत जाणं पसंत केलं होतं. ज्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षही ताब्यात घेतला. त्यामुळे साहजिकच पवार कुटुंबातही फूट पडली.
मात्र, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अजित पवार यांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना आपलीच बहीण सुप्रिया सुळेविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यामुळे पवार कुटुंबातील फूट ही स्पष्टपणे दिसून आली. पण याच निवडणुकीत बारामतीतील जनतेने सुप्रिया सुळेंच्या बाजूने मतदान करत अजित पवारांना धक्का दिला.
दरम्यान, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाने बारामतीतून अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना तिकीट दिलं होतं. पण यावेळी मतदारांनी अजित पवारांच्या बाजूने मतदान केलं आणि त्यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवलं.
या सगळ्या घडामोडींमुळेच पवार कुटुंबात फूट पडली. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुरावा निर्माण झाला. पण आता हाच दुरावा बाजूला सारून सर्व कुटुंबाने एकत्र यावं यासाठी अजितदादांच्या आईने थेट विठुरायालाच साकडं घातलं आहे.