“तेव्हाच मी ठरवलं की, महाराष्ट्रातच…”, अजित पवारांनी मांडली भूमिका
राजीनामा नाट्यानंतर शरद पवारांनी नव्या कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेंवर ही जबाबदारी सोपवण्यात आली.
ADVERTISEMENT
Ajit Pawar News : राजीनामा नाट्यानंतर शरद पवारांनी नव्या कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेंवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. या निर्णयानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा महाराष्ट्रात होत आहे. त्यावर अजित पवारांनी पुन्हा एकदा सविस्तर भूमिका मांडली. (Maharashtra politics : sharad pawar new decision)
ADVERTISEMENT
सातार येथे अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “दिल्लीला मी कधी जात नाही, पण यावेळी मला बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे मी गेलो होतो. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेंना कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली गेली. इतरांनाही जबाबदारी दिली आहे. माझं मत मी कालच सांगितलं आहे. ट्वीटही केले होतं.”
हेही वाचा >> Chandrashekhar Bawankule: “शरद पवारांनी षडयंत्र सुरू केले आहे, कारण…”
“ती मीटिंग होती 11 वाजता. मी छगन भुजबळांना भेटलो, तर ते म्हणाले मला 12 वाजता बोलावलं. दोघांना एकाच वेळी बोलावलेलं असल्याने सोबत गेलो. माध्यमांना काही माहिती नसते. मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही. मी राज्याच्या पातळीवरचा विरोधी पक्षनेता आहे”, असं अजित पवार म्हणाले.
हे वाचलं का?
फ्लाईटमुळे लवकर निघालो
“माझी 4 वाजता पुण्यासाठी फ्लाईट होती, त्यामुळे मी पटकन उरकलं आणि गाडी बसलो. विमानतळावर पोहोचलो. तिथे 4 वाजताच्या विमानाची वेळ झाली 5.30. मग तिथून पुण्यात उतरल्यानंतर माध्यमांना बोललो. माझ्यावर कुठलीही जबाबदार टाकली नाही, असं माध्यमे दाखवत असल्याचे मेसेजस मला आले”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
मी विरोधी पक्षनेता असल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, “माझ्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी राष्ट्रवादीच्या आमदारांनी टाकलेली आहे. मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करतोय. परस्पर बातम्या दिल्या जात आहे. मग त्या बातम्यांचं खंडन न करण्याच्या कामात वेळ जातोय.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> अजित पवारांना कार्याध्यक्ष का केलं नाही?, शरद पवारांनी खरं काय ते सांगूनच टाकलं!
“मी आता धुळ्याला, अंमळनेर, जळगाव आणि औरंगाबादला जाणार आहे. परळीलाही एक कार्यक्रम आहे. नागपूरलाही कार्यक्रम आहे. तिकडे जाणार आहे. मी आधीपासूनच सांगतोय की, मला राष्ट्रीय राजकारणात रस नाहीये. मी बारामतीकरांनी मला 1996 साली निवडून दिलं, त्यावेळी सहा महिने राहिलो. मी ते सगळं चित्र बघितलं. माझी कामाची पद्धत, राष्ट्रीय पातळीवरील कामाची पद्धत वेगळी आहे म्हणून मी ठरवलं की, महाराष्ट्रात काम करायचं. तेव्हापासून आजपर्यंत मी महाराष्ट्रात काम करतोय”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT