CM शिंदेंना ठाण्यावरून घेरलं, आता मंत्र्यालाही झापलं! महायुतीत अजित पवारच ‘दादा’?
दादा भूसे यांच्या या विधानावर आज अजित दादांना प्रश्न विचारण्यात आले होता. यावेळी अजित दादांनी दादा भूसे यांना चांगलेच झापले होते. दादा भूसे यांनी अशी प्रतिक्रिया द्यायला नको हवी होती, अशी प्रतिक्रिया देऊन अजित दादांनी भूसेंच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.
ADVERTISEMENT
गेल्याच आठवड्यात महायुतीची बैठक पार पडली होती. या बैठकीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच ‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे?’ असा सवाल केला होता. या सवालानंतर अजित पवार आणि शिंदेमध्ये वाद होणार होता, मात्र फडणवीसांच्या मध्यस्थीने तो टळला होता. ही घटना ताजी असतानाच आता अजितदादांनी शिंदेंच्या मंत्र्यालाच झापल्याची घटना समोर आली आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांना प्रतिप्रश्न केल्याची घटना ताजी असताना आता त्यांच्याच मंत्र्यांला झापल्याने, अजितदादांच महायुतीत चाललंय काय आहे? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय. (ajit pawar question cm shinde now criticize minister dada bhuse what happening in mahayuti maharashtra politics)
ADVERTISEMENT
शिंदेंच्या मंत्र्याला दादांनी फटकारले…
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शु्ल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावरून राज्य़ातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला होता. या निर्णयावर शिंदे गटाचे मंत्री दादा भूसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत दादा भूसे यांनी कांद्याचे दर परवडत नसतील तर खाऊ नका, 2-3 महिने कांदा खाल्ला नाही तर काही बिघडणार नाही,असे अजब विधान दादा भूसे यांनी केले होते.
हे ही वाचा : Maharashtra Politics : शिंदेंची खेळी… 12 आमदार नियुक्तीत ‘मविआ’ला कसा बसला झटका!
दादा भूसे यांच्या या विधानावर आज अजित दादांना प्रश्न विचारण्यात आले होता. यावेळी अजित दादांनी दादा भूसे यांना चांगलेच झापले होते. दादा भूसे यांनी अशी प्रतिक्रिया द्यायला नको हवी होती, अशी प्रतिक्रिया देऊन अजित दादांनी भूसेंच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. आणि आम्ही त्यांना अशी विधान करण्यास टाळायला सांगू,असे विधान करुन अजित दादांनी दादा भूसे यांना झापले होते. विशेष म्हणजे अजित दादा भूसे यांना झापत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्याच्याच बाजूला बसले होते.
हे वाचलं का?
मुख्यमंत्री शिंदेंनाच प्रश्न केला
दरम्यान याआधी ठाण्यातील रूग्णालयात झालेल्या 24 रूग्णांच्या मृत्यूप्रकरणी महायूतीने मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत भाजपसोबतअजित पवार गटाचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यी शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत ठाण्यातील मृत्यूप्रकरणावर चर्चा होत असतानाच, अजित दादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे?’ असा सवाल केला होता. या सवालानंतर अजित पवार आणि शिंदेमध्ये वाद झाला होता, मात्र देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने हा वाद टळला होता.
हे ही वाचा : Onion Price : शेतकरी संतापले, विरोधकांनी घेरलं, CM शिंदे- अजित पवारांनी काय सांगितलं?
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या बैठकीतील वादावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत शिंदे यांनी अजित दादांचा जो विषय आहे, तो जुना झाला आहे. अजित पवार यांनी कॅबिनेट मध्ये ठाणे येथील प्रश्न उपस्थित केले होते. पण हा राजकीय विषय नाही, या संदर्भात समिती नेमली आहे,असे शिंदे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
एकूणच काय तर मुख्यमंत्री शिंदे प्रश्न केल्यानंतर आता त्यांच्याच मंत्र्याला त्यांच्यासमोरच झापल्याने अजितदादांचं नेमकं चाललंय काय? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT