Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या बातमीने अजितदादांना बसला धक्का, म्हणाले मला तर...

मुंबई तक

ADVERTISEMENT

बाबा सिद्दीकींच्या हत्येची बातमीने अजितदादांना बसला धक्का
बाबा सिद्दीकींच्या हत्येची बातमीने अजितदादांना बसला धक्का
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू

point

अजित पवार यांना बसला धक्का

point

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar: मुंबई: मुंबईच्या वांद्रेत माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. बॉलिवूडमध्येही मोठा दबदबा असलेल्या बाबा सिद्दीकी अनेक सेलिब्रिटींनाही धक्का बसला आहे. (ajit pawar was shocked by the news of baba siddique murder his first reaction came out)

ADVERTISEMENT

दरम्यान, याच घटनेबाबत जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना समजलं तेव्हा त्यांनाही प्रचंड धक्का बसला. एक्सवर (ट्विटर) त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा>> Baba Siddique Death : खळबळजनक! अजित पवारांचे नेते बाबा सिद्दीकींची हत्या, गोळीबारात झाला मृत्यू

बाबा सिद्दीकींचा मृत्यू आणि अजित पवारांना बसला धक्का...

बाबा सिद्दीकींच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर अजित पवार यांनी याबाबत म्हटलं की, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.'

हे वाचलं का?

'या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. 

सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया  

'मी आताच माझे सगळे कार्यक्रम आटोपून माझ्या रायगडमधील निवासस्थानी आलो आहे. आपल्या आताच बातमी कळली. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांशी संपर्क साधतोय. परंतु आम्हा सर्वांसाठी ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. गेली अनेक वर्ष बाबा सिद्दीकी हे मुंबईत काम करत आहेत. यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करावा. तसेच बाबा सिद्दीकी यांच्यावर तातडीने उपचार त्यांच्यावर केले जावेत असंही मी रुग्णालयांना सांगेन.' असे सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Who is Baba Siddique: भर रस्त्यात हत्या झालेले बाबा सिद्दीकी नेमके होते तरी कोण?, बॉलिवूडमध्येही...

'तसेच मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना घटनास्थळी पोहचण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी अजितदादा, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती करेन की त्यांनी पोलीस दलाला या घटनेबाबत तात्काळ सूचना द्याव्या.'

ADVERTISEMENT

'काल संध्याकाळी आम्ही एक पक्षप्रवेश केला तेव्हा बाबा सिद्दीकी हे आमचे वरिष्ठ नेते म्हणून उपस्थित होते. त्यावेळी चर्चा झाली होती. प्रत्येक जण आपल्या मतदारसंघात काम करतो आहे.बाबा सिद्दीकी यांनी मुंबईत जी दीर्घकाळ राजकीय सेवा दिली आहे ते अजातशत्रू होते. पण आता पोलीस तपासातच या गोष्टी बाहेर येतील. मी आता ताबडतोब प्रशासनाशी बोलतो, असे देखील सुनील तटकरे म्हणाले.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT