मोठी बातमी: NCP अध्यक्षपदाबाबत अजित पवारांचं सनसनाटी वक्तव्य, म्हणाले मी…
शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित पवार करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आता अजित पवार यांची भूमिका समोर आली आहे. शरद पवार यांनी जर राष्ट्रावादीचा अध्यक्ष बनवलं तर तुम्ही बनणार का असा असा अजित पवार यांना पत्रकाराने विचारला होता.
ADVERTISEMENT
Ajit Pawar Sensational Statement on NCP President : भाकरी फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आता आली आहे. आता विलंब करून चालणार नाही,असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून काही दिवसांपुर्वीच पक्षात नेतृत्व बदलाचे संकेत दिले होते. या विधानानंतर आज शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझ्या सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. पवारांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भावुक होतं,शरद पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. वाय.बी.सेंटरमध्ये तब्बल दीड तास शरद पवारांची मनधरणी सुरु होती. मात्र शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. एकीकडे शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा सुरु असताना, दुसरीकडे शरद पवारांनतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण संभाळणार अशीही चर्चा सुरू होती. यामध्ये आपसुकच खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार अजित पवार ही दोन नावे आघाडीवर होती. राष्ट्रवादीतील ही दोन नावे खरंच नेतृत्व सांभाळण्यासाठी उत्सुक आहेत का याबाबतची भूमिका समोर आली नव्हती. मात्र आता अजित पवार यांची भूमिका समोर आली आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष होणार का? यावर ते पत्रकारांना काय म्हणाले आहेत. हे जाणून घेऊयात.(ajit pawar’s sensational statement regarding ncp presidentship sharad pawar political retirement)
ADVERTISEMENT
अजित पवार काय म्हणाले?
शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित पवार करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आता अजित पवार यांची भूमिका समोर आली आहे. शरद पवार यांनी जर राष्ट्रावादीचा अध्यक्ष बनवलं तर तुम्ही बनणार का असा असा अजित पवार यांना पत्रकाराने विचारला होता.यावर अजित पवार म्हणाले, नाही, मी नाही बनणार, मी त्याच्यात काम करू शकत नाही, असे ते म्हणाले. पुढे अजित पवार म्हणतात, प्रश्नच येत नाही, विचार करण्याचाही प्रश्न येत नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या या विधानानंतर त्याचा अध्यक्ष पदात रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे. झी 24 तासला याबाबतची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती.
हे ही वाचा : राजीनाम्याबाबत शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय, अजितदादांनी सांगितला नेमका निरोप!
सुप्रिया सुळे होऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष
दरम्यान, आजच्या दिवसातील सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष किंवा कार्यकारी अध्यक्ष होऊ शकतात. जर शरद पवार यांनी विचार बदलला नाही तर अशा पद्धतीचा विचार हा होऊ शकतो. असं सूत्रांकडून समजतं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
शरद पवार 2 ते 3 दिवसात निर्णय़ जाहीर करणार
ADVERTISEMENT