Kirit Somaiya यांचा कथित आक्षेपार्ह Video Viral, ‘सामना’ने ‘कशी’ दिली बातमी?
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसेना (UBT) पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनातून अत्यंत तिखट शब्दात बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
News on Maharashtra Politics: मुंबई: भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ (alleged offensive video) समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून याप्रकरणी तिखट प्रतिक्रिया समोर येत आहे. मात्र, याबाबत शिवसेना (Shiv Sena UBT)पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने (Saamana) देखील अत्यंत जहाल शब्दात किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला चढवला आहे. मुखपत्राच्या पहिल्याच पानावर व्हायरल व्हिडीओतील सोमय्यांचे स्क्रिन ग्रॅब (Screen Grab) छापण्यात आले आहेत. तसेच ठाकरी शैलीत या बातमीचा मथळा (Headline) देखील देण्यात आला आहे. (alleged offensive video of bjp leader kirit somaiya saamana newspaper shiv sena ubt published news very harsh terms latest news of maharashtra politics)
ADVERTISEMENT
सोमय्यांचा वादग्रस्त व्हिडीओ समोर येताच आता शिवसेना (UBT) पक्षाचे नेते काय भूमिका घेणार आणि सामनात नेमकी काय बातमी दिली जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. आजच्या सामनामधून यावेळी किरीट सोमय्यांवर जोरदार हल्ला चढविण्यात आला. ‘प्रचंड धमाका! सेक्स स्कँडलचा अणुबॉम्ब फुटला!’ असं मथळ्याखाली सोमय्यांबाबतची बातमी सामनात छापण्यात आली आहे.
ठाकरे गटाची सोमय्यांना पुरती घेरण्याची रणनीती
खरं तर सोमय्या आणि ठाकरे यांच्यातील वाद हा 2017 पासून सर्वश्रुत आहे. 2017 साली मुंबई महापालिका निवडणुकीत युती झालेली नसल्याने सोमय्यांनी शिवसेनेवर आणि विशेषत: उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून ते आजतागायत दोघांमधील राजकीय शत्रुत्व हे वाढतच गेलं.
हे वाचलं का?
महाविका आघाडी सरकारच्या काळात तर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अत्यंत गंभीर असे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांनंतर अनेकांवर ईडीच्या कारवाया देखील झाल्या. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सोमय्यांविरोधातील राग हा अधिकच वाढत गेला.
हे ही वाचा >> Kirit Somaiya: आक्षेपार्ह Video वर सोमय्यांची 12 तासानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मात्र, आता किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्याने शिवसेना (UBT) ला सोमय्यांविरोधात आयतं कोलीत मिळालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून सोमय्यांविरोधात आंदोलनं केली जात आहेत. तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशनात सभागृहात त्यांच्याविरोधात चौकशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंना भिडणाऱ्या सोमय्यांना पुरती घेरण्याची रणनीती ही ठाकरे गटाने आखल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याची सुरुवात ही ‘सामना’तील बातमीमधून केली देखील आहे.
ADVERTISEMENT
‘त्या’ Video वर सोमय्यांनी काय दिली प्रतिक्रिया?
‘एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे.’
ADVERTISEMENT
‘माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही. अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी देवेंद्र फडणवीस यांना विनंती.’ असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं.
यासोबत किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी चौकशी व्हावी असं पत्रही दिलं आहे.
आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत.
हे ही वाचा >> Kirit Somaiya: सोमय्यांच्या ‘त्या’ कथित Video वर अखेर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया
अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार…. झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT