Anand Dighe : अपघात की घातपात? आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

anand dighe death controversy dharmveer 2 movie sanjay shirsat vs kedar dighe maharashtra politics
धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू कसा झाला?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा राजकारण तापलंय

point

दिघेंचा नेमका मृत्यू कसा झाला होता?

point

दिघेंच्या मृत्यूनंतर ठाण्यात काय घडलं?

Anand Dighe Death Controversy : धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणारा 'धर्मवीर-2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. अशात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ''आनंद दिघे यांना मारलं गेलं, हे अख्खं ठाणे जिल्हा जाणतो'' असे मोठं विधान केले आहे. या विधानावर आता ''संजय शिरसाट 23 वर्षे काय करत होते? मग तुम्ही तोंडं गप्प करून का बसला होतात? तुमचा स्वार्थ काय होता? असा सवाल केला आहे. त्यामुळे दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा राजकारण तापताना दिसतंय. त्यामुळे दिघेंचा नेमका मृत्यू कसा झाला होता? आणि मृत्यूनंतर ठाण्यात काय काय घडलं हे जाणून घेऊयात. (anand dighe death controversy dharmveer 2 movie sanjay shirsat vs kedar dighe maharashtra politics) 

ADVERTISEMENT

वर्ष 2001 आणि तारीख 24 ऑगस्ट...या तारखे दरम्यान महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जात होता. त्यामुळे या गणेशोत्सवानिमित्त आनंद दिघे कार्यकर्त्यांच्या घरातील गणपतींचे दर्शन घेत होते. या दरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला होता. एसटी बस आणि त्यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या अपघातात त्यांच्या पाय हा फ्रॅक्चर झाला होता आणि त्यांच्या डोक्याला मार लागलं होतं.

हे ही वाचा : Dharmveer 2 Collection : 'धर्मवीर 2' ने सगळेच रेकॉर्ड मोडले, पहिल्या दिवशी जमवला 'इतक्या' कोटीचा गल्ला

25 तारखेला रविवारी त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली होती. पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली. या सर्जरीनंतर सोमवारी संध्याकाळी 7.15 वाजता त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. त्यानंतर 7.25  मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला. त्यानंतर अखेर रात्री 10.30 वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी दिघे 50 वर्षांचे होते. हॉस्पिटलमध्ये दिघेंसोबत ठाण्याचे शिवसेना खासगार प्रकाश परांजपे होते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'आनंद दिघे आपल्यातून गेले'

आनंद दिघेंचा मृत्यू झाला हे सांगण्यास कुणीच धजावत नव्हतं. शेवटी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की, ''आनंद दिघे आपल्यातून गेले''. उद्धव ठाकरे यांच्या या घोषणेनंतर हॉस्पिटल बाहेरील दिघेंच्या 1500 कार्यकर्त्यांनी संपूर्ण हॉस्पिटलला आग लावली होती. या आगीत हॉस्पिटलमधील रुग्णवाहिका, 200 बेड बेचिराख करण्याक आले होते. यानंतर तत्कालीन उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आणि नंतर 34 जणांना अटक करण्यात आली. दिघेंच्या मृत्यूनंतर ठाणे बंद ठेवण्यात आलं होतं. असं असतानाही हजारो शिवसैनिक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. 

हे ही वाचा : Anand Dighe Death: 'आनंद दिघेंचा घात झाला, त्यांना मारलं..', संजय शिरसाठांनी उडवून दिली खळबळ

दिघेंच्या मृत्यूवर शिंदे काय म्हणाले होते? 

आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत एकनाथ शिंदे यांनीच माहिती दिली होती. ते म्हणाले होते की आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत विविध चर्चा सुरू असतात. गणपतीचे दिवस होते. त्या दिवसात त्यांचा १९ ऑगस्टला अपघात झाला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात नेलं असता तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आहे. अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली असंही शिंदे यांनी सांगितलं होतं. असं सगळं असलं तरीही आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा घडतातच. खासकरून तो अपघात होता की घातपात ही चर्चा आजही रंगताना दिसते आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT