Sharad Pawar: राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, जितेंद्र आव्हाडांनीही दिला राजीनामा!
राष्ट्रवादी काँग्रेसेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयाने नाराज झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी देखील पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी ही घोषणा केल्यापासून नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. अशातच काही पदाधिकाऱ्यांनी कालच (2 मे) आपल्या पदाचा राजीनामा दिले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पवारांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (another big blow to ncp congress jitendra awhad also resigned from the post of national general secretary of the party)
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी आग्रही मागणी जितेंद्र आव्हाड हे कालपासून करत आहेत. त्याचे पडसादही आता उमटू लागले आहेत. कारण ठाण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आता राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी देखील पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.
हे ही वाचा>> सर्वात मोठी बातमी, सुप्रिया सुळे होऊ शकतात NCP च्या कार्याध्यक्ष!
शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं अशी जितेंद्र आव्हाड यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी हा राजीनामा दिल्याचं आता समोर आलं आहे. त्याच्या या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीत राजीनामा सत्राला सुरुवात झाली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
‘ठाण्यातील सगळे जण आपआपले राजीनामे पाठवत आहेत. जयंत पाटील साहेबांना. सगळ्यांचेच राजीनामे आहेत. मी सुद्धा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागेल. कारण ते नेहमीच म्हणतात की, लोकशाहीत लोकांचं आपण ऐकलं पाहिजे. लोकांचा जो कल आहे त्यासोबत नेत्यांनी चाललं पाहिजे. नेते जरीही त्याबाबत नाराज असले तरीही लोकांचा जो कल आहे त्याच बाजूला त्यांनी असायला हवं.’
आदरणीय @PawarSpeaks साहेब नेहमी म्हणतात की,”लोकशाही मध्ये जनतेचा कौल नेहमी मान्य करायचा असतो.मग तो आपल्या स्वत:च्या मर्जीविरुद्ध का असेना.हीच खरी लोकशाही आहे..!”
अस असताना आता खुद्द पवार साहेबांनीच त्यांच्या या विचारांशी फारकत घेत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा… pic.twitter.com/QFqqaOs2Ov— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 3, 2023
ADVERTISEMENT
‘त्यामुळेच शरद पवार हे असं कसं करू शकतात? त्यांनी आम्हाला विश्वासात का नाही घेतलं? आमचं आयुष्य त्यांच्यासाठी काही नाही का? या लढाईत आम्ही शरद पवार यांच्याशिवाय कसं काय लढू शकतो?’
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> मोठी बातमी: NCP अध्यक्षपदाबाबत अजित पवारांचं सनसनाटी वक्तव्य, म्हणाले मी…
‘मी राजीनामा दिला आहे. मी किती लोकं माझ्यासोबत आहे हे पाहून राजकारण करत नाही. मी 35 वर्ष राजकारणात आहे. पण मी हे अजिबात बघत नाही की माझ्यापाठी कोण आहे. मी जी-जी भूमिका घेतली आहे ती लोकांनीही घेतली आहे आणि नंतर पक्षाने देखील घेतली आहे.’
‘शरद पवार हे नेहमीच नव्या लोकांना संधी देतात. पक्षात अनेक पदं आहेत तिथे नवी लोकं घ्यावी. आता आम्ही देखील राजीनामे दिले आहेत. घ्या नवीन लोकांना… पण त्यांनी जाता कामा नये.’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या निर्णयाबाबत आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT