Manoj Jarange Patil : 'एवढ्या वेळेस समाजाची लेकरं बना...'; कंठ दाटला, जरांगे सर्वांसमोर रडले!
Manoj Jarange Emotional Cry : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडी वेगाने वाढताना दिसत आहेत. आता मनोज जरांगेसुद्धा आपल्या उमेदवारांना मैदानात उतवणार आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मनोज जरांगेसुद्धा आपल्या उमेदवारांना मैदानात उतवणार.
जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले.
Maharashtra vidhan sabha election : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडी वेगाने वाढताना दिसत आहेत. सध्या राज्यात महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन महाशक्ति, एमआयएम यांच्यासह अनेक छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार मैदानात आहेत. तर त्यानंतर आता मनोज जरांगेसुद्धा आपल्या उमेदवारांना मैदानात उतवणार आहेत. यासाठी जरांगेंनी रविवारी 3 नोव्हेंबर 2024 रोजी पत्रकार परिषद बोलावली. यावेळी कुणाला भिडणार आणि कुणाला पाडणार यावर बोलताना जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले. (antarwali sarati manoj jarange cry while announcing candidates list for maharashtra vidhan sabha election)
ADVERTISEMENT
हेही वाचा : Uddhav Thackeray : "आदित्य ठाकरेंसाठी आम्हाला..." ठाकरेंच्या नेत्याची बंडखोरी, विधानसभेच्या मैदानात उतरून दंड थोपटले
जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Emotional Moment While Announcing Candidate List:'आमच्या उमेदवाराला त्रास दिला तर तुमचे उमेदवार पाडणार, आम्हाला हौस म्हणून राजकारण करायचं नाही. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना तिथे पाठवायचं आहे. एवढ्या वेळेस समाजाची लेकरं बना,' असं म्हणत मनोज जरांगे सर्वांसमोर रडले.
"आता मर्दासारखं झुंजायचं आणि निवडून यायचं. या समाजाचा अपमान होऊ देऊ नका मराठा समाजाचे सर्व उमेदवार निवडून आणा. आमदार आणि पक्ष नेत्याचे लेकरू बनू नका. माझा पण आहे समाजाला आरक्षण मिळवून द्यायचा. समाजाला संपवणाऱ्याला संपवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
हे वाचलं का?
हेही वाचा : Eknath Shinde: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! CM एकनाथ शिंदे म्हणाले, "फक्त 1500 रुपये नाही, महिलांसाठी..."
माझ्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. माझ्या रक्तात भेसळ नाही... मी बदला घेणार. एवढा विखारी अन्याय कुणीच केला नव्हता. 14 महिन्यांपासून समाज रस्त्यावर आहे आणि हे आमच्या देखत दुसऱ्यांना आरक्षण देत आहेत. मी माझ्या समाजाचा बदला घेणार तेव्हाच मरणार. माझं कुटुंब कुठे आहे ते सुद्धा मला माहिती नाही. सैरावैरा आयुष्य झालंय माझं. समाजाला संपवणाऱ्याला पहिले संपवा, तरच तुम्ही खानदानी आहात. या समाजावर सरकारने इतके वाईट दिवस आणले आहेत, " अशा स्पष्ट शब्दात मनोज जरांगेंनी निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT