'संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालेल तो नालायक ठरेल', वड्डेटीवारांची जहरी टीका

योगेश पांडे

संतोष देशमुख हत्या प्रकरणी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावर आता विजय वड्डेटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

विजय वडेट्टीवारांची जहरी टीका
विजय वडेट्टीवारांची जहरी टीका
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गुन्हेगाराला जात, धर्म , पंथ नसतो, विजय वडेट्टीवारांनी नामदेव शास्त्रींना सुनावलं

point

काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका

point

शेतकरी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, कंत्राटदार सगळ्यांचे पैसे थकले, सरकावर वडेट्टींवारांनी साधला निशाणा

नागपूर: 'सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आरोपींची पाठराखण कोणीही करू नये. गुन्हेगाराला जात, धर्म, पंथ नसतो. त्यामुळे साधू, संत महंतांनी देखील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली तर त्यांचे श्रेष्ठत्व दिसले असते.' अशी भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे.

विजय वडेट्टीवारांची जोरदार टीका

'संतोष देशमुख प्रकरणाला मराठा विरुद्ध ओबीसी रूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे योग्य नाही. गुन्हेगार आमच्या समाजाचा आहे म्हणून त्याला पाठीशी घाला असे सगळेच म्हणायला लागले तर कायदा आणि सुव्यवस्था राज्यात उरणार नाही.' 

हे ही वाचा>> नामदेव शास्त्रींना चिंता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची, म्हणाले अगोदर 'त्यांना' मारहाण...

'सरपंच देशमुख यांची हत्या ही भयावह घटना आहे. त्यामुळे आरोपींना पाठीशी घालणारे नालायक ठरतील.' अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

नागपूर इथे पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, 'राज्यात शेतकरी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, कंत्राटदार यांचा निधी प्रलंबित आहे. विदर्भात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांना 386 कोटींचा मदतीचा प्रस्ताव सरकारकडे गेले सहा महिने धूळ खात पडला आहे.' अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

हे ही वाचा>> 'लोकांचे बळी घेणाऱ्या धनंजय मुंडेंचं तुम्ही समर्थन करताय...', आव्हाड संतापले थेट नामदेव शास्त्रींना...

'शेतकऱ्यांकडून धान, सोयाबीन खरेदी केली तरी त्यांना पैसे देण्यात आले नाही, अंगणवाडी सेविका असतील निराधार योजनेचे पैसे देण्यात आलेले नाही. आता सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारानी देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे. ओबीसी विद्यार्थांना देखील निधी मिळत नाही. त्यामुळे सरकार नेमकं काय काम करत आहे? असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. 

'इतके बहुमत मिळून ही जर विविध घटकांना त्यांचे पैसे मिळत नसतील तर हे सरकार अस्थिर आहे.' अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp