Meera Borwankar Ajit pawar : “तू मला सोडून गेलास, मी तुला सोडणार नाही”
meera borwankar ajit pawar news : आशिष शेलार यांनी मीरा बोरवणकर आणि अजित पवार प्रकरणात नवी शंका उपस्थित केली. त्यांचा रोख शरद पवारांच्या दिशेने असल्याची चर्चा त्यांच्या विधानानंतर सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
Meera Borwankar madam commissioner book Ajit pawar News : ‘मॅडम कमिशनर’ या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिलीये. द मिनिस्टर या चॅप्टरमध्ये मीरा बोरवणकर यांनी पोलीस भूखंडावरून थेट अजित पवारांवर आरोप केले. अजित पवारांनी ते फेटाळले असले, तरी त्यावरून राजकारण मात्र तापलं आहे. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर काही दिवसांतच हा मुद्दा समोर आल्यानं वेगवेगळ्या राजकीय शंका उपस्थित होत आहे. यातच आता मुंबई भाजपचे नेते आशिष शेलार यांनी अदृश्य शक्ती म्हणत नवा मुद्दा उपस्थित केला आहे. (Ashish Shelar Reaction on Meera Borwankar allegations)
ADVERTISEMENT
मॅडम कमिशनर या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील एका भूखंडाचा उल्लेख केलेला आहे. येरवडा येथे मध्यभागी असलेला पोलिसांचा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हाचे पालकमंत्री अजित पवार यांनी लिलाव करून हा भूखंड बिल्डरला हस्तांतरित करण्यास मला सांगितले होते, असा दावा बोरवणरकरांनी केला आहे.
आशिष शेलार काय म्हणाले?
बोरवणकरांच्या आरोपांबद्दल बोलताना शेलारांनी नवी शंका उपस्थित केली आहे. “मीरा बोरवणकर यांचं पुस्तक मी वाचलेलं नाही. त्यामुळे अधिकृत प्रतिक्रिया तर मी देणार नाही, पण मला एक जाणवतंय की अजितदादा आमच्यासोबत सत्तेत आल्यावर ज्या काही घटना घडतायत, ते पाहता एक अदृश्य शक्ती सांगू पाहते की ‘तू मला सोडून गेलास, मी तुला सोडणार नाही’ असा काहीसा वास येतोय”, असं शेलारांनी म्हटलं आहे. त्यामुळे ही अदृश्य शक्ती कोण? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
बोरवणकरांच्या आरोपानंतर अजित पवार वादाच्या भोवऱ्यात
मीरा बोरवणकर यांच्या आरोपानंतर अजित पवार वादात सापडले आहेत. अजित पवारांनी हे आरोप फेटाळले आहेत. पण, बोरवणकरांच्या आरोपामुळे विरोधकांना अजित पवारांना खिंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट अजित पवारांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा >> Meera Borwankar : बोरवणकरांच्या बदलीला आर.आर पाटलांनी केला होता विरोध -पृथ्वीराज चव्हाण
“अजित पवारांवरील आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यांची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत पवार यांना कार्यमुक्त करावे”, असे म्हणत नाना पटोलेंनी थेट राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> “…म्हणून एकनाथ शिंदे मिरच्या झोंबल्याप्रमाणे तडतडताहेत”, शिवसेनेचा (UBT) वार
दुसरीकडे रोहित पवार यांनीही याबद्दल महत्त्वाचं भाष्य केलं आहे. अजित पवारांवर मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. त्यामुळे अजित पवार अडचणीत आले असून, शिंदे सरकारच्या अडचणीही वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT
पालकमंत्री झाले आणि वादात सापडले
पालकमंत्री झाल्यानंतर हा मुद्दा समोर आला आहे. पुण्याचे पालकमंत्री पद भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते. अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद मागून घेतले. पालकमंत्री झाल्यानंतर काहीच दिवसांत हा मुद्दा चर्चेत आला. त्यामुळे याचा संबंध अजित पवार यांच्या पालकमंत्रीपदाशीही लावला जात आहे.
ADVERTISEMENT