Badlapur News: 'तिने आई-बापाची शपथ घेऊन सांगायचं...', वामन म्हात्रे म्हणतात मी तसं बोललोच नाही!

मुंबई तक

ADVERTISEMENT

वामन म्हात्रे म्हणतात मी तसं बोललोच नाही!
वामन म्हात्रे म्हणतात मी तसं बोललोच नाही!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिला पत्रकाराबाबतचं ते विधान वामन म्हात्रेंना पडणार महागात?

point

वामन म्हात्रेंनी आरोपाचं केलं खंडन

point

पत्रकार मोहिनी जाधवला आरोप सिद्ध करण्याचं दिलं आव्हान

Vaman Mhatre: बदलापूर: बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाविरोधात एकीकडे जनता रस्त्यावर उतरलेली असताना  दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेना नेत्याने महिला पत्रकारावर अर्वाच्य भाषेत टिप्पणी केल्याचा आरोप होत आहे. याच प्रकरणी आता शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी आता पत्रकार मोहिनी जाधव यांना थेट आव्हान दिलं आहे. (badlapur news she used to swear to her parents shiv sena leader vaman mhatre tried to defend himself in obscene remarks on a woman journalist case)

बदलापूर येथे आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरलेले असताना दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला पाहताच ''तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय'', अशी अशोभनीय भाषा वापरली असल्याचा आरोप वामन म्हात्रेंवर करण्यात आला.

हे ही वाचा>> Raj Thackeray Tweet: "...म्हणून बदलापूरच्या आक्रोशाला तोंड फुटलं"; राज ठाकरेंच्या ट्वीटनं खळबळ

ज्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण लागलं असून आता या प्रकरणावरून वामन म्हात्रेंच्या अटकेची मागणी केली जात आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणाबाबत बोलताना वामन म्हात्रे नेमकं काय म्हणाले तेही आपण पाहूया.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'तिने तिच्या आई-बापाची शपथ घेऊन सांगायचं की वामन म्हात्रे असं बोलला...'

'मी आपल्या सगळ्या पत्रकारांना साक्ष ठेवून सांगतो.. वामन म्हात्रेच्या तोंडून कधीही अपशब्द कुठल्याही महिलेच्या विषयी निघणार नाही. हा राजकीय स्टंट आहे. कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू आहे. त्या योजनेपासून लक्ष भरकटविण्यासाठी हा राजकीय स्टंट केला आहे.' 

'मोहिनी जाधवला मी आव्हान केलं होतं कालच.. की तिने तिच्या आई-बापाची शपथ घेऊन सांगायचं की वामन म्हात्रे असं बोलला.. खरं तर ज्या पीडित मुलीला न्याय मिळून द्यायचं काम आम्ही सर्व बदलापूरवासी करत होतो. त्यात आघाडीवर होते.' 

'मोहिनी जरी पत्रकार असेल तरी ती मीनल मोरे, संगीता चेंदवणकर असेल.. अशा 4-5 जणींचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपने एक आवाहन केलं होतं की, आपण शालेय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करू. ते आंदोलन करणं बाजूलाच राहिलं या ठिकाणी बाहेरचे आंदोलक आले आणि त्याठिकाणी दंगलीचं स्वरुप देण्याचा प्रयत्न केला.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Badlapur News: '...आता आंदोलन करावं लागणार का?' बदलापूरच्या घटनेवर राहुल गांधींचं मोठं ट्वीट

'असा बाइट संगीता चेंदवणकरने स्वत: दिली आहे. तुम्ही ते दाखवा.. हे लोकं 9.30 वाजता तिथून निघून गेले. त्यानंतर     मुख्यमंत्री साहेबांशी मी बोललो.. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, ही केस आपण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा कशी देता येईल ते पाहू.' 

ADVERTISEMENT

'मुख्यमंत्र्यांचा हा मेसेज मी आंदोलकांना सांगितला आणि त्यांना शांत केलं. त्यानंतर मोहिनी जाधव तिथून येत होती आणि मी तिथून जात होतो.. मी फक्त तिला एवढंच म्हटलं की, मोहिनी तुम्ही तीन दिवसांपासून हे आंदोलन तुम्ही सांभाळलं.. तर लोकांना देखील तुम्ही सत्य परिस्थिती सांगायला पाहिजे, तुम्ही तिथून निघून जायला नको.. एवढंच बोललो.. पण काही ठाण्यातील आणि इतर नेते यांनी कट रचून मला बदनाम करण्यासाठी हे सगळं केलं आहे.'

'मी किंवा आमच्या घरातील ती संस्कृती नाही. आम्ही महिलांचा आदर करतो. वामन म्हात्रे सर्वात जास्त महिलांसाठी काम करतो.' असा दावा वामन म्हात्रे यांनी यावेळी केला आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT