Badlapur News: आता वामन म्हात्रे म्हणतात, 'त्या लोकांना बदलापूरमध्ये दंगल घडवायची होती'

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

'बदलापूरमध्ये  दंगल घडवायची होती', वामन म्हात्रेंचा खळबळजनक आरोप
'बदलापूरमध्ये दंगल घडवायची होती', वामन म्हात्रेंचा खळबळजनक आरोप
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूर प्रकरणी शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप

point

बदलापूरमध्ये दंगल घडवायची होती, वामन म्हात्रेंच्या आरोपाने खळबळ

point

महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याच्या आरोपाने वामन म्हात्रेंवर सुरू आहे टीका

Shiv Sena Vaman Mhatre: बदलापूर: बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराला शिवसेना (शिंदे गट) नेते वामन म्हात्रे यांनी अर्वाच्च भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर वामन म्हात्रे हे अचानक चर्चेत आले. आता त्यांनी बदलापूर आंदोलन प्रकरणी आणखी एक खळबळ उडवून देणारं विधान वामन म्हात्रे यांनी केलं आहे. (badlapur news shiv sena ubt workers wanted to create riots in badlapur why did shiv sena leader vaman mhatre say this)

ADVERTISEMENT

शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी वामन म्हात्रे यांनी बदलापुरातील आंदोलक स्थानिक नसून ते बाहेरचे होते, त्यांचा उद्देश हा बदलापुरात दंगल घडवून आणण्याचा होता आणि ते सर्व उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते असा खळबळजनक आरोप केला आहे.

पाहा वामन म्हात्रे नेमकं काय म्हणाले... 

'मी संगीता (संगिता चेंदवणकर, मनसे कार्यकर्ता) यांना सांगितले की, लोक आंदोलन करत आहेत, आपण प्रशासनाशी चर्चा करून आंदोलन थांबवलं पाहिजे, पण त्या म्हणाल्या की, 'मला मारायला बाहेरून लोक आले आहेत.' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'उद्धव ठाकरेंच्या वाहनावर मनसेने दगडफेक केली तेव्हा संगिता या तिथे हजर होत्या. त्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते बदलापुरात आले होते. पण संगिता यांनी सावधगिरी बाळगली आणि त्या तिथून वेळीच निघून गेल्या.'

हे ही वाचा>> Badlapur News: '2000 रुपये आमच्याकडून घ्या, तुमची लाडकी बहीण योजना नको...' शिंदे सरकारवर बदलापूरकर संतापले!

'त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आंदोलनात भाग घेऊन बदलापूरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक डीसीपी, एसीपी, पोलीस आणि लोकप्रतिनिधींनी मिळून माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीने पीडित मुलीला 3 महिन्यांत न्याय मिळवून देऊ, असे सांगून स्थानिक आंदोलक शांत केले. पण बाहेरून आलेल्या आंदोलकांना बदलापूरमध्ये दंगल घडवायची होती.'

'इथे त्यांचे जिल्हाध्यक्ष फिरत होते, तसेच काही नगरसेवकही उपस्थित होते. मी नाव घेणार नाही, पण तुमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते आले असावे. मी चार मुलांना विचारलं की, तुम्ही कुठून आलात... तेव्हा त्यांनी सरळ-सरळ सांगितलं की, मी  कल्याणहून आलो आहे, मी चेंबूरहून आलो आहे.. असा 15 जणांचा ग्रुप होता. जे मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करत होते.' 

ADVERTISEMENT

'मी त्यांना सांगितले की, मुख्यमंत्री साहेबांनी याबाबत निर्णय घेतला आहे. पण ते इथे येणार नाहीत. मात्र तोपर्यंत काही लोक दगडफेक करण्याची तयारी करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना तिथून हुसकावून लावलं.' असं म्हणत वामन म्हात्रे यांनी या प्रकरणी आता नवे आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

 ''तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय'', वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराला वापरलेले अपशब्द?

दरम्यान, लैेगिक अत्याचार प्रकरणाचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराला वामन म्हात्रे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

हे ही वाचा>> Badlapur News : ''तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय'', CM शिंदेंच्या नेत्याची मुजोरी

''तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय'', अशी अशोभनीय भाषा वापरल्याचा आरोप महिला पत्रकाराने वामन म्हात्रेंवर करण्यात आला होता.

एक महिला पत्रकार ही बदलापूर अत्याचार प्रकरणाच वार्तांकन करत असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि शिंदेच्या सेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ''तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय'' अशी अर्वाच्च भाषा वापरली होती. या प्रकरणी महिला पत्रकाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

महिला पत्रकाराच्या आरोपावर म्हात्रे काय म्हणाले? 

महिला पत्रकाराने केलेल्या आरोपावर वामन म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, 'महिला पत्रकाराची स्टंटबाजी आहे. मोहिनी जाधव चांगल्या परिचयाची पत्रकार आहे. पण ती एका राजकीय पक्षाचं शिवसेना (UBT) चं काम करते. मी तिला विचारलं की, तुम्ही 2-3 दिवसापासून या बातम्यांचं कव्हरेज केलं. मुलीवर बलात्कार झाला की नाही झाला याची शहानिशा करून तुम्ही ते सांगायला पाहिजे. तसेच मी कुठच्याही प्रकारचं घाणेरडं वाक्य हे त्या महिला पत्रकाराला बोललो नाही. तिने स्टंटबाजीसाठी हे स्वत:वर ओढावून घेतले.' असं वामन म्हात्रे यांनी म्हटलं.

'मी कुठल्याही अश्लील भाषेत पत्रकार मोहिनी जाधव हिच्याशी बोललो नाही. वामन म्हात्रे हा महिलांचा आदर करणारा शहरप्रमुख आहे. माझ्याकडून आतापर्यंत अशी चूक झालेली नाही आणि भविष्यातही होणार नाही.' असं म्हणत वामन म्हात्रे यांनी आपल्यावरील आरोपाचं खंडन केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT