Nitish Kumar : ठाकरेंनंतर आता बिहारचं सरकार कोसळणार
बिहारमध्ये सध्या महाराष्ट्रासारखा सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. कारण बिहारमध्ये लालू प्रसाद यादव (Lalu prasad yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि नितीश कुमार यांनी जनता दल यूनायटेडची आघाडी तूटण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
Bihar Political Crisis, Nitish Kumar vs Lalu Prasad Yadav : गेल्या साधारण दोन वर्षापूर्वी म्हणजेच 29 जून 2022 ला राज्यात ठाकरेंचे (Uddhav Thackeray) सरकार कोसळलं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नेत्यांनी वेगळा गट स्थापण करत भाजपसोबत हातमिळवणी करून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापण केले होते. आता अशीच राजकीय परिस्थिती बिहारमध्ये निर्माण झालीय. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) कोणत्याहीक्षणी राजीनामा देण्याची तयारीत आहेत. नितीश कुमार हे भाजपसोबत युती करणार असून पुन्हा एकदा राज्यात भाजप आणि नितीश कुमार यांची सत्ता येणार आहे. या सत्तेसाठी भाजप बिहारमध्ये शिंदे पॅटर्न राबवणार असल्याची पडद्यामागे घडामोड सूरू आहे. नेमकी ही राजकीय घडामोड काय आहे? ते जाणून घेऊयात. (bihar political crisis vs bjp strategy nitish kumar lalu prasad yadav tejashwi yadav 10 congress mls separate group)
ADVERTISEMENT
बिहारमध्ये सध्या महाराष्ट्रासारखा सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. कारण बिहारमध्ये लालू प्रसाद यादव (Lalu prasad yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि नितीश कुमार यांनी जनता दल यूनायटेडची आघाडी तूटण्याची शक्यता आहे. नितीश कुमार या आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत हातमिळवणी करणार आहे. त्यामुळे आता बिहारच सरकार कोणत्याही क्षणी कोसळून भाजप आणि नितीश कुमारांच सरकार अस्तित्वात येणार आहे.
हे ही वाचा : Maratha Reservation : ‘मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल केली’, उल्हास बापटांनी दाखवली ‘ही’ चूक
नितीश कुमारांना 8 आमदारांची आवश्यकता नितीश कुमार लालूंपासून वेगळे होतं जर त्यांनी भाजपशी यूती केली तर त्यांना 8 आमदारांच बळ लागणार आहे. त्याशिवाय त्यांचे बहुमत पूर्ण होणार नाही. त्यामुळे आता नितीश कुमारांना 8 आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ही जुळवाजुळव नितीश कुमारांसोबत भाजप देखील करत आहे. त्यामुळे 8 आमदार फोडणे भापजसाठी बाए हात का खेल है!
हे वाचलं का?
भाजप शिंदे पॅटर्न राबवणार
महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेतून काही आमदारांनी बाहेर पडून शिंदेंच्या नेतृत्वात वेगळा गट निर्माण केला होता. नंतर याच गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत भाजपसोबत हातमिळवणी करून राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर आणले होते. अशीच स्ट्रेटेजी भाजप आता बिहारमध्ये राबवणार आहे. बिहारमध्ये भाजपला नितीश कुमारांसोबत सत्ता स्थापण करण्यासाठी 8 आमदारांची आवश्यकता आहे. यासाठी भाजप काँग्रेसचे 10 आमदार फोडण्याची तयारी करतेय.
हे ही वाचा : Manoj Jarange : ओबीसी नेत्यानेच ‘सगेसोयरे’ गोंधळ केला दूर, सांगितलं खरं काय?
भाजपच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे 10 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. काँग्रेसचे हे आमदार बिहारमध्ये वेगळी चुल मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिंदे गटाप्रमाणेच काँग्रेसचे हे आमदार देखील वेगळा गट स्थापण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि या गटाच्या माध्यामातून भाजप सत्ता आणण्याची तयारी करत आहे. दरम्यान बिहारमध्ये काँग्रेसचे 19 आमदार आहेत. त्यामुळे 10 आमदार फुटून त्यांनी वेगळा गट जरी स्थापन केला तरी त्यांची आमदारकी जाणार नसल्याची सांगितले जात आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान एकीकडे भाजप काँग्रेसचे आमदार फोडण्याची तयारी करतेय, तर दुसरीकडे नितीश कुमार हे जीतनराम मांझी यांचे 4 आमदार, एमआयएमचा एक आणि एक अपक्ष आमदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जर भाजपसोबत काँग्रेसचे 10 आमदार आल्यास बहुमताचा आकडा पूर्ण होणार आहे. आणि भाजप नितीश कुमारांसोबत सत्तेत येणार आहे. त्यामुळे नेमकं बिहारच्या राजकारणात काय घडतं. हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT