Mahayuti : अजित पवारांमुळेच महायुतीला धोका? काय आहे राजकीय अर्थ?
Mahayuti : 'अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचारावरुन सडकून टीका करणाऱ्या भाजपनेच नंतर अजित पवार यांना सोबत घेतलं' असं म्हणून विरोधकांकडून कायम भाजपला टार्गेट केलं जातं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अजित पवार यांच्यामुळे भाजपचं नुकसान?
भाजप कार्यकर्ते अजितदादांवर नाराज?
अजितदादांमुळे फायदा की तोटा?
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आणि सगळ्याच पक्षांनी रणशिंग फुंकलंय. यंदाची निवडणूक ही काहीगोष्टींमुळे विशेष ठरणार आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे यंदाच्या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि मनसेसह अनेक इतर पक्ष मैदानात असणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या समिकरणांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचाच थेट परिणाम हा तिकीट वाटपामध्येही होताना दिसतोय. तसंच अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन पक्षांना घेऊन भाजप पहिल्यांदाच मैदानात असल्यानं भाजपसमोरही मोठं आवाहन असणार आहे. (BJP and Ajit Pawar alliance situation amid assembly elections 2024)
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Vidhan Sabha: ऐन मध्यरात्री महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीचा आकडा ठरला!
भाजपने काही दिवसांपूर्वीच आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर शिवसेनेनेही आपल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र अजित पवार यांच्या उमेदवारांची अधिकृत यादी अजून समोर आलेली नाही. भाजपला अजित पवारांची अडचण झाली आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय. काही महिन्यांपूर्वी आरएसएसच्या मुद्द्यावरुन झालेलं वादंग असो की, त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी असो, अजित पवार यांना सोबत घेण्याबद्दल भाजपच्या अंतर्गत भावना या काहीशा वेगळ्या असल्याचं दिसून आलंय. मात्र भाजपच्या बड्या नेत्यांनी कायम त्या शक्यतांचं खंडण केलंय.
हे वाचलं का?
भाजपला अजित पवार यांच्यामुळे धोका?
सुरूवातीच्या काळात अजित पवार यांच्यावर सडकून टीका करणाऱ्या भाजपनेच नंतर अजित पवार यांना प्रवेश दिला असं म्हणून विरोधकांकडून कायम भाजपला टार्गेट केलं जातं. त्यामुळे भाजपला अजित दादांना सोबत घेण्याचा फटका बसला आहे का असा सवाल तयार होतो. अजित पवार यांच्यासोबतच्या युतीमुळे फक्त भाजपच्या इमेजलाच नाही तर आकड्यांनाही फटका बसू शकतो असं भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना वाटतंय. अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत, मात्र मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने त्यांना क्लीन चिट दिली होती.
संघाच्या ऑर्गनाईझर या इंग्रजी मुखपत्रातून याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसंच पुण्यात भाजप नेत्या आशा बुचके यांनीही अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांनी अजित पवार यांना काळे झेंडेही दाखवले होते.
ADVERTISEMENT
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला फारसं यश मिळालं नाही. स्वत: अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही या निवडणुकीत पराभूत झाल्यात. त्यामुळे अजित पवार यांच्याबाजून मतदारांचा कल किती आहे? याबद्दलही सवाल उपस्थित होता. याच सर्व मु्द्द्यांमुळे भाजपला अजित पवार यांचा फायदा होणार हा प्रश्न भाजपकडून अंतर्गत चर्चांमध्ये उपस्थित केल्या जातो.
ADVERTISEMENT
हे ही वाचा... Ajit Pawar Candidates List |
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT