BJP Candidate List : भाजपने संधी दिलेल्या 'त्या' 13 लाडक्या बहिणी कोण? यादीत कुणाची नावं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

भाजपकडून 13 'लाडक्या बहि‍णीं'ना संधी
भाजपकडून 13 'लाडक्या बहि‍णीं'ना संधी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपच्या यादीत किती लाडक्या बहिणींना संधी?

point

भाजपच्या 99 उमेदवारांची यादी जाहीर

point

भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या त्या लाडक्या बहिरणी कोण?

BJP Candidate List मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती लाडकी बहीण योजनेची. कारण या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. त्यामुले सुरुवातीला या योजनेसाठी फॉर्म भरण्यापासूनच या योजनेला लोकप्रियता मिळत असल्याचं दिसलं. त्यानंतर आता विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 8 दिवसांची मूदत उरलेली असताना आता राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारी याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. भाजपने नुकतीच आपली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीच्या माध्यमातून काही महिला आमदारांनाही संधी दिली आहे. त्यामुळे भाजपकडून तिकीट मिळालेल्या लाडक्या बहिणी कोण हे जाणून घेऊ. (BJP Candidate List with 13 Women Candidates for Assembly Elections 2024)

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Sanjay Raut : सांगलीवर बोलत असाल तर आम्हीही कोल्हापूर, रामटेकचं... राऊतांचा थेट काँग्रेसला इशारा?

 

भारतीय जनता पक्षाने रविवारी दुपारी 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये भाजपने 13 लाडक्या बहि‍णींना संधी मिळाली आहे. 

1. भोकर - श्रीजया चव्हाण
2. फुलंब्री - अनुराधा चव्हाण
3. कल्याण पूर्व - सुलक्षा गायकवाड 
4. श्रोगांदा - प्रतिभा पाचपूते 
5. चीखली - श्वेता महाले 
6. जिंतूर - मेघना बोर्डीकर
7. नाशिक पश्चिम - सीमा हिरे
8. बेलापूर - मंदा म्हात्रे 
9. दहिसर - मनीषा चौधरी 
10. गोरेगाव - विद्या ठाकूर
11. पर्वती - माधुरी मिसाळ
12. शेवगाव - मोनिका राजळे 
13. केज - नमिता मुंदडा 

हे वाचलं का?

भाजपने या लाडक्या बहि‍णींना संधी दिली असल्यानं आता त्या त्या मतदारसंघातील राजकीय समि‍करणंही बदलण्याचं चित्र आहे. तर भाजपने जाहीर केलेल्या या यादीत तब्बल 96 टक्के उमेदवार विद्यमान आहेत किंवा त्यांच्या कुटुंबातील उमेदवारांनाच उमेदवारी दिली आहे. 

हे ही वाचा >>Bjp Candidate 1st List : भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' 5 मतदारसंघ खेचले, 'त्या' जागांवर कोण लढणार?

 

भाजपच्या यादीचं विश्लेषण 10 मुद्द्यांमध्ये

 

हे ही वाचा >>Manoj Jarange : जरांगेंची विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा, कुठे-कुठे उमेदवार उभा करणार?
• एकूण 99 उमेदवार घोषित. त्यापैकी 89 भाजपचे विद्यमान आमदार
• 89 पैकी 82 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी, म्हणजेच 93 टक्के आमदार पुन्हा मैदानात
• इतर 7 पैकी 5 तिकीट आमदारातील कुटुंबीयांना दिलीत. त्यामुळे एकूण 87/89 आमदारांना पुन्हा संधी.(98%).
• 2 जागांवर नवे उमेदवार.
• फुलंब्री मतदारसंघातील विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याने तिथे अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी मिळाली. 
• तर दुसरी जागा कामठी आहे. जिथून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि 4 टर्म आमदार 2019 मध्ये त्याचे तिकीट कापल्यानंतर पुनरागमन केले.

ADVERTISEMENT

• 10 जागा अशा आहेत जिथे भाजपकडे एकही विद्यमान आमदार नाही.  2019 प्रमाणेच 5 उमेदवारांची पुनरावृत्ती.
• 2019 च्या विजयी उमेदवारांचं निधन झाल्याने एका मतदारसंघात कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली.
• 4 नवीन चेहरे आहेत. 
•  99 पैकी 95 उमेदवारांची पुनरावृत्ती झाली आहे. म्हणजे पुन्हा तिकीट मिळणाऱ्यांचा दर 96% पर्यंत आहे. 


 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT