Bjp Candidate 1st List : भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' 5 मतदारसंघ खेचले, 'त्या' जागांवर कोण लढणार?
Bjp Candidate 1st List : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर यापैकी पाच मतदार संघ हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे होते.हे पाच मतदार संघ भाजपने शिंदेकडून खेचून घेतले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भाजपने आज 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली
'हे' पाच मतदार संघ भाजपने शिंदेकडून खेचले
'या' जांगावर भाजपने कोणता उमेदवार दिला?
Bjp Candidate 1st List, Devendra Fadnavis vs Eknath Shinde : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर यापैकी पाच मतदार संघ हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे होते.हे पाच मतदार संघ भाजपने शिंदेकडून खेचून घेतले आहेत. यामध्ये नालासोपारा, उरण, धुळे शहर, अचलपूर, देवळी या मतदार संघाचा समावेश होतो. या जांगावर आता भाजपने कोणता उमेदवार उभा केला आहे? हे जाणून घेऊयात. (bjp first candidate list bjp declare candidate on shiv sena eknath shinde constituenct seat maharashtra assembly election 2024)
ADVERTISEMENT
भापजने राजन नाईक यांना नालासोपाऱ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. 2019 या मतदार संघातून शिवसेनेचे प्रदीप शर्मा उमेदवार होते. विशेष म्हणजे नालासोपाऱ्यात कोणताही भाजपचा किंवा भाजपचा पाठिंबा असलेला अपक्ष आमदार निवडून आलेला नसताना या मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार दिला आहे. उरणमधून भाजपने महेळ बालदींना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघात शिवसेनेचे मनोहर भोईर हे 2019 ला उमेदवार होते.
हे ही वाचा : BJP Candidates List: सर्वात मोठी बातमी! भाजपची पहिली यादी जाहीर, 99 उमेदवारांची नावं वाचा एका क्लिकवर
धुळ्यात 2019 ला शिवसनेनेचे हिलाल माळी हे धुळे शहराचे उमेदवार होते. पण याच मतदारसंघातून भाजपकडून यंदा अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अचलपूरमधून अतुल तायडेंना भाजपने यंदा उमेदवारी दिलीये. याच मतदारसंघातून सुनिता फिसके या शिवसनेच्या उमेदवार होत्या. देवळी मतदारसंघात भाजपकडून राजेश बकानेंना उमेदवारी देण्यात आली आहे.
हे वाचलं का?
अपक्ष उमेदवारांना दिली संधी
तसेच भाजपने त्यांच्या दोन जागांवर अपक्ष उमेदवारांना संधी दिली आहे. इंचलकरंजीतून अपक्ष लढलेल्या प्रकाश आवाडेंनी भाजपचे सुरेश हळवणकर यांना पराभूत केले होते. त्यामुळे या जागेवर भाजपने प्रकाश आवाडेंना उमेदवारी दिली आहे. आणि गोंदियात अपक्ष लढलेल्या विनोद अग्रवालांनी भाजपच्या गोपाल अग्रवाल यांचा पराभव केला होता. त्यामुळे भाजपने अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे.
हे ही वाचा : BJP Candidate List : किती विद्यमान आमदारांना संधी, कुणाला डच्चू? भाजपच्या यादीचं10 मुद्द्यांमध्ये विश्लेषण
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT