Chandrashekhar Bawankule: "उद्धव ठाकरेंनी 2019 ला ब्लंडर मिस्टेक केली...", चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांना दिलं रोखठोक उत्तर
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढू. एकदा आम्हाला आजमंवायचच आहे. नागपूरला सुद्धा स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांचा घेतला समाचार

चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

बावनकुळे पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढू. एकदा आम्हाला आजमंवायचच आहे. नागपूरला सुद्धा स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं. बावनकुळे म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी 2019 ला ब्लंडर मिस्टेक केली होती. ती ब्लंडर मिस्टेक त्यांना कळाली आहे. भाजप आणि देवेंद्रजींना बाजूला करून ज्या काँग्रेसच्या विचारांना त्यांनी साथ दिली होती. काँग्रेसचा स्वीकारलेला विचार त्यांच्या अंगावर आला. लोकसभा निवडणुकीच्या विजयाच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकत होते. सावरकरांचा अपमान होत होता. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली दिली जात होती. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जात होतं. या ज्या चुका झाल्या, त्या आता त्यांच्या निदर्शनास आल्या. याचा त्यांनी अभ्यास केला की या आमच्या ब्लंडर मिस्टेक होत्या. काँग्रेसच्या विचारावर जाऊन उद्धव ठाकरेंची शिवसेना कधीच उभी राहू शकत नाहीत. म्हणून संजय राऊत असे बोलले असावेत".
चंद्रशेखर बावनकुळे पत्रकार परिषदेत म्हणाले, महाविजयाची विधानसभेची सुरुवात केली होती. पुण्याच्या बालेवाडीच्या अधिवेशनात महाविजयाचा संकल्प केला होता. आज आम्ही या अधिवेशनात विजयानंतर जनतेचे आभार मानतोच आहे. पण या विजयातून महाराष्ट्रातील भाजपची संघटना ही दीड कोटी सदस्य संख्येची असावी, असाही संकल्प आम्ही करत आहोत. महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीची संघटना ही एक लक्ष बूथवर बूथ अध्यक्ष आणि बूथ समितीची असावी. आमची भाजपची संघटना ही प्रत्येक तालुक्यात आमचा अध्यक्ष आमची समिती ही पुढच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत गठीत व्हावी, असा आमचा संकल्प या अधिवेशनात आहे. आमचे जवळपास 76 जिल्हाध्यक्ष गठीत करण्याचा संकल्प करत आहोत. फेब्रुवारीपर्यंत आमचे सर्व जिल्हाध्यक्ष निवडले जातील.
हे ही वाचा >> Sushil Walmik Karad : वाल्मिक कराडपाठोपाठ आता त्याचा मुलगा सुशील कराडवरही गंभीर आरोप, सोलापुरात तक्रार
महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या विकास योजना करू, त्या योजनांच्या माध्यमातून आम्ही स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांत पुढं जाऊ. 14 कोटी जनतेनं आम्हाला 3 कोटी लाखांच्या वर मतं दिली. भाजपला तर 52 टक्के मतं दिली. आम्ही एवढच नमूद करतो. श्रद्धा-सबुरी आमच्यात होती. श्रद्धा सबुरीवरच आम्ही विश्वास ठेवला. महाराष्ट्राने भाजपची श्रद्धा सबुरी बघितली. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला प्रचंड मतदान केलं. ज्यांनी ज्यांनी श्रद्धा सबुरीवर विश्वास ठेवला, साई बाबांच्या या शब्दावर विश्वास ठेवला, ते या महाराष्ट्रामध्ये नक्कीच विजयाकडे गेले आहेत, असंही बावनकुळे म्हणाले.