Kirit Somaiya यांचा ठाकरेंकडून तीनदा ‘गेम’, अमित शाहांसमोरच..; नेमका वाद काय?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

bjp leader kirit somaiya video controversy thackeray faction uddhav thackeray politically ostracized somaiya 3
bjp leader kirit somaiya video controversy thackeray faction uddhav thackeray politically ostracized somaiya 3
social share
google news

Kirit Somaiya Viral Video: मुंबई: भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे कथित आक्षेपार्ह व्हिडीओ (allegedly offensive video) व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातही शिवसेना (UBT)पक्षाच्या नेत्यांनी आता सोमय्यांना खिंडीत पकडण्यासाठी नवी व्यूहरचना केली आहे. मात्र, ठाकरे गटासाठी (Thackeray Faction) किरीट सोमय्या हे मागील काही वर्षांपासून ‘टार्गेट’ का राहिले आहेत याचविषयी आम्ही आपल्याला सविस्तरपणे सांगणार आहोत. (bjp leader kirit somaiya video controversy thackeray faction uddhav thackeray politically ostracized somaiya 3 times shiv sena ubt)

ADVERTISEMENT

ठाकरेंनी कसा केलेला किरीट सोमय्यांचा तीनदा गेम?

1. ठाकरेंकडून सोमय्यांचा पहिला गेम: 2014 विधानसभा निवडणुकांदरम्यान शिवसेना आणि भाजपची युती तुटली. पण निकालानंतर हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले. त्यानंतर सरकार चालवित असताना दोन्ही पक्षांमध्ये सुंदोपसुंदी ही सुरूच होती. मात्र, 2017 साली जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा पुन्हा एकदा या दोन्ही पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता.

त्यावेळी देखील शिवसेना-भाजपची युती होऊ शकली नव्हती. ज्यानंतर पालिकेच्या प्रचारसभांदरम्यान भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. ज्यामध्ये किरीट सोमय्या हे अग्रस्थानी होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजपमधील ते एकमेव नेते होते की, त्यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दरम्यान, महापालिका निवडणुकीत अगदी काहीशा फरकाने शिवसेनेने बाजी मारली होती. त्यानंतर भाजपने राज्यातील आपलं सरकार स्थिर राहावं या दृष्टीने महापौर निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे मधल्या काळात जे आरोप-प्रत्यारोप झाले होते ते काहीसे मागे पडले होते.

हे ही वाचा >> Kirit Somaiya: सोमय्यांच्या ‘त्या’ कथित Video वर अखेर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

मात्र, उद्धव ठाकरे हे यापैकी काहीही विसरले नव्हते. त्याचं उदाहरण म्हणजे या निवडणुकानंतर काही महिन्यांनी भाजपचे तत्कालीन खासदार किरीट सोमय्या हे आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले होते. मात्र, त्यावेळी त्यांना मातोश्रीवर प्रवेश नाकारण्यात आला होता. याबाबतची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली होती.यानंतर देखील शिवसेनेने सोमय्यांबाबतचा आपला विरोध कायम ठेवला होता.

ADVERTISEMENT

2. ठाकरेंकडून सोमय्यांचा दुसरा गेम: 2019 लोकसभा निवडणुकीआधी अमित शाह हे ‘मातोश्री’वर आले होते. जिथे उद्धव ठाकरे आणि त्यांची निवडणुकीत युती व्हावी यासाठी चर्चा झाली होती. याच बैठकीत लोकसभा-विधानसभेसाठी युती ही पक्की झाली.

ADVERTISEMENT

याबाबतची घोषणा करण्यासाठी त्यानंतर शिवसेना-भाजपची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याच वेळी दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते हे पत्रकार परिषदेला हजर होते. ज्यामध्ये किरीट सोमय्या यांचा समावेश होता. पण जेव्हा उद्धव ठाकरे हे या पत्रकार परिषदेला पोहचले तेव्हा त्यांनी सोमय्यांना पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला होता. सोमय्यांनी इथे थांबू नये असं त्यांनी निक्षून अमित शाह यांना सांगितलं होतं. ज्यानंतर सोमय्यांना पत्रकार परिषद भरविण्यात आलेल्या हॉलमधून बाहेर जावं लागलं होतं.

3. ठाकरेंकडून सोमय्यांचा तिसरा गेम: तिसरी घटना ही सोमय्यांवर ठाकरेंनी घातलेला मोठा घावच होता. अगदी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधी शिवसेनेने किरीट सोमय्या यांना भाजपने तिकीट देऊ नये. जर भाजपने त्यांना तिकीट दिलं तर शिवसेना त्यांच्याविरोधात उमेदवार देईल, अशी भूमिका घेतली. खरं तर भाजपसाठी देखील शिवसेनेची ही मागणी अनपेक्षित होती. पण ज्या मतदारसंघातून सोमय्या निवडणूक लढवणार होते त्यामधील भागात शिवसेनेच्या मतदारांचं बरंच प्राबल्य होतं. तीच गोष्ट लक्षात घेऊन शेवटच्या क्षणी भाजपने नेतृत्वाने सोमय्यांचं तिकीट कापून मनोज कोटक यांना खासदारकीचं तिकीट दिलं. जिथून ते निवडून देखील आले.

2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि सोमय्या ठाकरेंविरोधात बेछूट आरोप…

2019 विधानसभा निवडणुका या भाजप आणि शिवसेनेने युतीत लढल्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरुन ही युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. ज्यामुळे भाजप आणि शिवसेनेत मोठा दुरावा निर्माण झाला.

याच गोष्टीचा सर्वाधिक फायदा घेतला तो किरीट सोमय्या यांनी.. ज्या शिवसेनेमुळे सोमय्यांचे जे राजकीय नुकसान झालं होतं त्याच शिवसेनेवर तुटून पडण्याची आयती संधीच सोमय्यांना राज्यातील सत्ताबदलानंतर मिळाली होती.

त्यानंतर सोमय्यांनी अत्यंत आक्रमकपणे महाविकास आघाडीत नेत्यांवर हल्लाबोल सुरू केला. सुरुवातील शिवसेनेतील अनिल परब, भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांची काही प्रकरणं बाहेर काढत त्यांना ईडीच्या माध्यमातून त्यांनी अडचणीत आणलं. तर या पाठोपाठ मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. पत्रा चाळ प्रकरणी तर संजय राऊत यांना तुरुंगात देखील जावं लागलं.

हे ही वाचा >> Kirit Somaiya यांचा कथित आक्षेपार्ह Video Viral, ‘सामना’ने ‘कशी’ दिली बातमी?

सोमय्या एवढ्यावरच थांबले नाही तर मुंबई महापालिकेत भ्रष्टाचारावरून त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना थेट टार्गेट केलं. तर अलिबागमधील एका जमिनीच्या प्रकरणावरुन त्यांनी रश्मी ठाकरे यांचं नाव घेत उद्धव ठाकरेंच्या अडचणीत अधिक वाढ कशी होईल यासाठी बरेच प्रयत्नही केले. या सगळ्या प्रकारमुळे ठाकरे आणि सोमय्या यांच्यातील राजकीय शत्रुत्व हे प्रचंड वाढत गेलं.

असं असताना आता जेव्हा किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसेना (UBT) प्रचंड आक्रमक झालं आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली.

या सगळ्या घटनेमुळे आता किरीट सोमय्या यांच्या अडचणीत भर पडली आहेच. मात्र, ठाकरे गटाला त्यांच्याविरोधात रान पेटविण्यासाठी आयती संधीच चालून आल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT