भाजप आमदाराच्या ताफ्यातील कारची दुचाकीला धडक, एका व्यक्तीचा जागीच मृत्यू

मुंबई तक

BJP Mla Jaykumar Gore Car Accident : भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारने दुचाकीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे- पंढरपूर मार्गावर फलटणजवळ हा अपघात झाला. कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला.

ADVERTISEMENT

Jaykumar Gore
Jaykumar Gore
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघात

point

या भीषण अपघातात एकाच्या मृत्यू, तर चार जण जखमी

point

अपघाताच्या घटनेबाबत जयकुमार गोरे काय म्हणाले?

BJP Mla Jaykumar Gore Car Accident : भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारने दुचाकीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. भाजप आमदार गोरे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाटी येथील निवासस्थानातून बाहेर पडल्यावर त्यांच्या ताफ्यातील कार भरधाव वेगानं जात होत्या. त्याचदरम्यान शेरेवाडी येथून निघालेल्या एका दुचाकीला गोरे यांच्या ताफ्यातील कारने धडक दिली, या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती आहे.

"माझा दौरा सुरू होता. माझी गाडी गावात पोहचली होती. एक गाडी मागे होती.. ती गाडी माझ्या ताफ्यासोबत नव्हती. पण मी निघून गेल्यावर हा अपघात झाला. त्या गाडीत माझी लोकं होती. त्यामुळे या प्रकरणात पोलीस कारवाई करतील जी असेल ती", अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी न्यूज 18 लोकमतला फोनवरुन दिलीय.

हे वाचलं का?

    follow whatsapp