Sunil Kamble: ‘कानशिलात कशी मारतात माहितीए ना..’, भाजप आमदाराची उर्मट भाषा
Sunil Kamble Pune: पुण्यात भाजप आमदार सुनील कांबळेंनी एका पोलिसाला कानशिलात लगावल्यानंतर देखील त्या कृताच यत्किंचितही पश्चाताप न होता आपण केलेल्या कृताच बचाव करत असल्याचं पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT
BJP MLA Sunil Kamble: पुणे: पुण्यात ससून रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात भाजप आमदार सुनील कांबळे यांनी (BJP MLA Sunil Kamble) एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलातच लगावली असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही सगळी घटना उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्यासपीठावरच असताना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतरही आमदार सुनील कांबळे यांनी अजिबात पश्चाताप नसल्याचं समोर आलं आहे. (bjp mla sunil kamble arrogent statement after slapped to policeman in pune)
ADVERTISEMENT
या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना सुनील कांबळे म्हणाले की, ‘कानशिलात कशी मारतात माहितीए ना.. त्याला मी.. असं हे केलं उलट्या हाताने.. कानशिलात मारायची म्हणजे.. मी झोपडपट्टीतला कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य झोपडपट्टीत गेलं. कानशिलात मारायचा प्रकार हा वेगळा असतो.’ असं म्हणत सुनील कांबळे यांनी त्यांच्या कृत्याचं एक प्रकारे समर्थनच केल्याचं पाहायला मिळालं.
हे ही वाचा>> Sunil Kamble: अजितदादांच्या कार्यक्रमात भाजप आमदाराने पोलिसाच्या थोबाडीत मारली, नेमकं काय घडलं?
वाचा त्या घटनेनंतर सुनील कांबळे नेमकं काय म्हणाले…
या सगळ्या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सुनील कांबळे यांनी आपण कानशिलात मारलीच नसल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, ‘सरकारी कार्यक्रमात अशी पद्धत नाही ना.. तिथे कोणाचा कोणाला ताळमेळ नव्हता. नुसती धक्काबुक्की.. काही प्रोटोकॉल आहेत की नाही.. आमदारांना धक्काबुक्की.. हे काही जाणूनबुजून झालेलं नाही..’
‘एकाने माझा शर्टच ओढला.. कोण होता ते मला माहिती नाही. त्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मी नाही मारलं.. पोलिसांनी मारलं त्याला.. मी त्याला सोडवलं उलट त्याला..’
‘कोनशिलेवर नाव नाही हे मी कलेक्टरशी सुरुवातीलाच बोललो मी. ते म्हणाले की, आमच्याकडून तपासून पाठवलं होतं. हे प्रशासनाने जाणूनबुजून काय केलं ते माहीत नाही. आता डीनचे फोन येत आहे मला त्यासाठी..’
‘कानशिलात कशी मारतात माहितीए ना.. त्याला मी.. असं हे केलं उलट्या हाताने.. कानशिलात मारायची म्हणजे.. मी झोपडपट्टीतला कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य झोपडपट्टीत गेलं. कानशिलात मारायचा प्रकार हा वेगळा असतो. त्याला कानशिलात नाही मारली. त्याला मी असं ढकललं.. मला असं ओढलं म्हणून.’
‘मला माहितीच नाही तो कोण आहे ते.. ठरवून कानशिलात मारायची म्हणजे काही तरी राग आलेला असतो.. किंवा अशा वेळेस कानशिलात मारतात.. मी फक्त त्याला ढकललं..’ असं म्हणत सुनील कांबळे यांनी स्वत:चा बचाव केला आहे.
हे ही वाचा>> Sharad Mohol : पुणे हादरलं! कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची भरदुपारी हत्या
दरम्यान, आता या प्रकरणी पुणे पोलिसात तक्रार दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. त्यामुळे आता भाजप आमदारावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT