Suresh Dhas : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार? सुरेश धस म्हणाले, "अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे..."
Suresh Dhas On Dhananjay Munde Resignation : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले असून अद्यापही धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार?

भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट सांगितलं, म्हणाले...

"त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी..."
Suresh Dhas On Dhananjay Munde Resignation : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले असून अद्यापही धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांच्यासह विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केलीय. अशातच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठं विधान केलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. आतातरी (धनंजय मुंडे) राजीनामा घेणार का? अशी मागणी अंजली दमानीया यांनी केलीय. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, "अंजली दमानीया ताई, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं, अशाप्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत. आमच्या जिल्ह्यातील त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंकी यांनी ती मागणी केली आहे. अनेक संघटना मागणी करत आहेत. जिथे जिथे मोर्चे निघत आहेत, तिथे सुद्धा त्यांची मागणी हीच आहे. पण मी स्वत: अजून त्यांचा राजीनामा मागितला नाही. या तपासात आकापर्यंत एसआयटी गेली आहे. आकाच्या पुढे गेल्यानंतर बोलू. त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा, हे सर्वस्वी अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हातात आहे.
हे ही वाचा >> Manoj Jarange : "...तर तुमचा कार्यक्रम लावायला वेळ लागणार नाही", एकेरी उल्लेख करत CM फडणवीस यांच्यावर टीका
"त्यांनी जर मनात आणलं, तर त्यांचा राजीनामा तातडीनं होऊ शकतो. आमचं काय आहे, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होतेय. त्यांचा पक्ष चुकीच्या बॉक्समध्ये चाललाय. आम्ही तर पॉजिटीव्ह बॉक्समध्ये चाललो आहोत. आमच्या मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखच्या प्रकरणात सर्व बाजू जनतेसमोर पॉजिटीव्ह कशा जातील, अशा पाहिलेल्या आहेत. मोक्का लावा म्हटल्यावर मोक्का लावला.
एसआयटी स्थापन करा म्हटलं, एसआयटी स्थापन केली. दहा लाखाची मदत द्या म्हटलं, तर दिली. या सर्व लोकांचा बंदोबस्त झाला पाहिजे. परळीत शुकशुकाट झालाय. तिथल्या लोकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. अन्यथा या सर्व गुंडांच्या दबावात लोकांना राहावं लागत होतं. जवळपास पाचशे लोकांनी, व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडून दिलं. घर, दार, धन दौलत सगळं सोडलं. यांच्याच त्रासाला कंटाळून पाचशे लोक परळी शहर सोडून गेले आहेत, असंही सुरेश धस म्हणाले.