Suresh Dhas: "पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटे आणि...", संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धस यांनी उडवली खळबळ

मुंबई तक

Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case:  बीड जिल्ह्याचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याने देशमुख कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

सुरेश धसांच्या 'त्या' पेनड्राईव्हमध्ये आहे तरी काय?
सुरेश धसांच्या 'त्या' पेनड्राईव्हमध्ये आहे तरी काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धस यांचं मोठं विधान!

point

"...त्याच्याशी झालेलं बोलणं सीआयडीसमोर जाऊ नये"

point

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case:  बीड जिल्ह्याचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याने देशमुख कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. अशातच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी कृष्णा आंधळे अजून फरार आहे, त्याच्या घातपात झालाय का? पुरावे नष्ट करण्याची भीती धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलीय.

यावर सुरेश धस म्हणाले, धनंजय जे बोलतो आहे, ते चुकीचे बोलतोय अशातला भाग नाही. परंतु, कृष्णा आंधळे करून करून काय करणार आहे? तो का पुरावे नष्ट करतोय, पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटे आणि ह्यांनी केलेलं आहे. विष्णू चाटेने दहा तारखेनंतर एकमेकांशी म्हणजेच आकाशी आणि त्याच्याशी झालेलं बोलणं सीआयडीसमोर जाऊ नये, असा प्रयत्न केलेला आहे. परंतु, तो त्यांचा प्रयत्न राहणार नाही. पोलीस लोक त्या कंपनीकडून त्यांच्याशी काय संवाद झाला? मला वाटतं मोबाईल बंद करून त्यांनी पाण्यात टाकला असावा. ते लवकरात लवकर सापडेल.

धनंजय जी शंका उपस्थित करतोय, त्याचासुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे, असं माझं मत आहे. तपास यंत्रणे बरोबर मी सतत बोलतोय. त्यांच्याशीही बोलतोय. कृष्णा आंधळे जो पोरगा आहे याला घराबद्दल, कुटुंबाबद्दल कुणाबद्दलच काही प्रेम नाही. हे निघालं की एकटच कुठंतरी निघतं. तसं ते गेलेलं आहे. तो जाऊन जाऊन कुठे जाणार? पोलिसांच्या पक्कडच्या बाहेर जाईल किंवा सीआयडीच्या पक्कडच्या बाहेर जाईल, असं नाही. धनंजयचा राग हा रास्त आहे. मी धनंजय बरोबर आहे.

हे ही वाचा >>'शिर्डीत एका बिल्डिंगमध्ये 7000 मतदारांची नोंद अन् भाजपा..' PM मोदींसमोरच राहुल गांधींचे गंभीर आरोप

मी संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर आहे. मी महादेव मुंडेंच्या कुटुंबासोबतही आहे. आज मी डीवायएसपींना विचारलं तर ते म्हणाले आमचा तपास चालू आहे. चोरमले डीवायएसपी तपास करत आहेत. महादेव मुंडेंचे मारेकरी सुद्धा लवकरात लवकर सापडले पाहिजेत. या लेकराच्या डोळ्यातलं जे पाणी आहे, ते पाहिल्यानंतर मलासुद्धा प्रचंड राग आलेला आहे. कुणीही असो, ते आरोपी सापडलेच पाहिजेत. संतोष देशमुखचा शेवटचा माणूस सुद्धा सापडला पाहिजे. 

हे ही वाचा >> Dhananjay Deshmukh: "त्यांच्यावर किती गंभीर गुन्हे आहेत, ते आम्ही...", धनंजय देशमुख नामदेव शास्त्रींबद्दल नेमकं काय म्हणाले?

हे वाचलं का?

    follow whatsapp