Mumbai News: भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं! शाई..दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज अन्...
BJP Yuva Morcha Workers Attacked Congress Party Office : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय का फोडलं?
भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर केले गंभीर आरोप
त्या घटनेचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
BJP Yuva Morcha Workers Attacked Congress Party Office : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाचे दरवाजे फोडून शाईफेक केली. काँग्रेसचे पदाधिकारी मंदार पवार यांच्यावरही जमावाने शाईफेक केल्याचं समोर आलंय. हा हल्ला पूर्वनियोजीत होता आणि पोलिसांनी काहीच केलं नाही, असा आरोप पवार यांनी केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली, त्यावेळी या कार्यालयात महिला पदाधिकारीही होत्या. दरम्यान, कार्यालयावर हल्ला करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा दावा भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याप्रकरणी संतप्त झालेले भाजपचे कार्यकर्ते मुंबई प्रेस क्लब जवळ असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयाज पोहोचले आणि त्या ठिकाणी शाईफेक, दगडफेक करून कार्यायल फोडलं. तसच राहुल गांधीच्या प्रतिमेवरही जमावाने शाईफेक केली. त्यानंतर कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केली. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने काँग्रेस कार्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं.
हे ही वाचा >> Honeymoon ला जाण्यावरून वाद, कल्याणमध्ये सासऱ्याचा जावयावर Acid हल्ला
"सत्ता आल्यापासून हे काय चाललंय, पाहतोय आम्ही. परभणीत महिला, पुरूष, लहान मुलांना झोडपून काढलं. त्यांनी घरात घुसून मारले. त्यांनी काय पाप केलं होतं. कोणाचा खून केला होता, सत्ता मिळाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचा उपयोग करणार काय? पोलीस कोणाच्या बळावर काम करत होते. पोलिसांना कुणाच्या सूचना होत्या. पोलिसांनी काय कारवाई केली? संतोष देशमुख नावाच्या सरपंचाला घरातून उचलून नेऊन ठार मारतात. ज्या पद्धतीनं त्याला मारलं गेलं, सत्ताधाऱ्यांना काय वाटायला नको..", अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT