Mumbai Tak Chavdi: "वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई...", सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
Bjp Mla Suresh Dhas On Walmik Karad: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या आणि खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला न्यायालयाने सीआयडीच्या मागणीनुसार 15 दिवसांची कोठडी सुनावलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सुरेश धस संतोश देशमुख हत्या प्रकरणावर काय म्हणाले?

सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर केले गंभीर आरोप

मुंबई तकच्या चावडीत सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
Bjp Mla Suresh Dhas On Walmik Karad: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या आणि खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला न्यायालयाने सीआयडीच्या मागणीनुसार 15 दिवसांची कोठडी सुनावलीय. देशमुखांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असतानाच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणी मोठी प्रतिक्रिया दिलीय. मुंबई तकच्या चावडीत धस यांनी वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले.
आमदार सुरेश धस मुंबई तकच्या चावडीत काय म्हणाले?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास खरंच निष्पक्षपातीपणे होतोय का? अजितदादांनी यामध्ये पुढाकार घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांचा तात्पुरता राजीनामा घ्यावा, तुम्हाला असं वाटतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, ही मी मागणी केली नाहीय. त्यांचेच आमदार आहेत आमच्या जिल्ह्यातील..ज्येष्ठ आमदार प्रकाशदादा सोळंकी यांनी मागणी केलेली आहे की, तुम्ही किमान बिनखात्याचे मंत्री तरी त्यांना करा..जोपर्यंत याची चौकशी होत नाही..याची चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत..ही मागणी मी नाही केलीय. त्यांच्याच आमदारांनी केलीय. अजितदादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचा निर्णय त्यांनी केला पाहिजे. त्यांच्या निर्णयाबाबत आम्ही कसं बोलू. आमच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत सगळ्या स्टेप्स पॉजिटीव्ह घेतल्या आहेत.
हे ही वाचा >> Mumbai Tak Chavdi: "शंभर टक्के वाल्मिक कराडचं नाव 302 मध्ये येईल...", सुरेश धस यांनी दिली खळबळजनक माहिती
सभागृहात ज्या ज्या मागण्या मी मांडल्या, त्या सर्वच मागण्या मंजूर झालेल्या आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार मकोका लागेल. चार्जशीटच्या नंतर त्यासाठी कारणे दाखवावे लागतील. यामध्ये बरंच काही येईल..यामध्ये राख, वाळू येईल. जमिनीच्या एजंट लोकांना धमक्या दिल्या जातात. ओटू कंपनी, अवादा कंपनी असेल, यांना कोणी कोणी धमक्या दिल्या आहेत, यांची आगंतूक मुळं कुठपर्यंत गेली आहेत? हे सोटमुळ (वाल्मिक कराड) काल पकडलेलं आहे. सोटमूळ स्वत:हून हजर झालं आहे. पण त्यांना आगंतूक मुळं म्हणतात ना..ही बीड जिल्ह्यात कुठपर्यंत पोहोचली आहेत? प्लॉटिंगच्या जबरी खरेदी..मार्केट कमिटीचे पाच एकरमध्ये चारशे प्लॉट..पाच एकरात चारशे प्लॉट बसतात का? ते परळीत बसतात. हा एक परळीचा नवीन पॅटर्न आहे. हे सर्व एकत्रिट पॅटर्न आकाभोवतीच फिरतंय. हे सगळं दाखवून मग त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई होईल, असंही सुरेश धस म्हणाले.