Chhagan Bhujbal : "तुम्ही मला उठ आणि बस सांगणार असाल तर...", छगन भुजबळ संतापले, तुफान बरसले

सुधीर काकडे

नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असून, वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र, राज्यात चर्चा सुरू आहे ती मंत्रिपद न मिळालेल्या नाराज आमदारांची. या नाराज नेत्यांमध्ये सर्वाधिक आक्रमक झाले आहेत ते छगन भुजबळ.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळ संतापले....

point

मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज?

point

पक्षश्रेष्ठींबद्दल काय म्हणाले?

Chhagan Bhujbal : मी काय खेळणं आहे का? चार महिन्यांपूर्वी मी राज्यसभेवर पाठवा म्हणालो होतो, पण आता तुम्ही वाटेल तेव्हा जा वर, या खाली, आता निवडणुका म्हणायला मी काय खेळणं आहे का? अशा शब्दात भुजबळ यांनी पक्ष नेतृत्वावर संताप व्यक्त केला. तुम्ही बस आणि उठ म्हणाल तर तसं करणारा छगन भुजबळ नाही अशी रोखठोक भूमिका भुजबळांनी घेतली. 


रविवारी 15 डिसेंबररोजी नागपूरमध्ये राज्यातीस नव्या सरकारच्या मंत्र्‍यांचा शपथविधी पार पडला. सध्या नागपुरातच अधिवेशन सुरू असून, वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र, राज्यात चर्चा सुरू आहे ती मंत्रिपद न मिळालेल्या नाराज आमदारांची. या नाराज नेत्यांमध्ये सर्वाधिक आक्रमक झाले आहेत ते छगन भुजबळ. छगन भुजबळ यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहेत. प्रश्न मंत्रि‍पदाचा नाही, पण जी अवहेलना झाली तो प्रश्न आहे असं भुजबळ म्हणाले. 

 

हे ही वाचा >> '...तर अडीच महिन्यातच मंत्री बदलू', महायुतीचा 'हा' कोणता फॉर्म्युला?
 

लोकसभेला मला डावलण्यात आलं हे खरं आहे. आम्हाला सांगण्यात आलं होतं की, मोदी-शाहांनी तुम्हालाच लढायला सांगितलं. त्यानंतर मी वेळ घेतला, चांगलं वातावरण तयार झालं, नाशिकच्या विकासात ज्यांना रस आहे, ते सर्व माझ्या पाठिमागे उभे राहिले. पण महिना उलटला तरी, माझं नाव आलं नाही, त्यामुळे मी माघार घेतली असं म्हणत भुजबळांनी सगळा घटनाक्रम सांगितला.

 

हे ही वाचा >> भाजपने खासदारांना बजावला व्हीप, काँग्रेसनेही... लोकसभेत काय घडतंय?

 

मुख्यमंत्र्‍यांनी मंत्रिमंडळात मी असावं यासाठी आग्रह धरला होता असं भुजबळ म्हणाले. लोकसभेला मी जातो म्हणालो, ते माझं नाव नाही जाहीर केलं. राज्यसभेची जागा आली, तेव्हा सुनेत्रा पवारांचं नाव आल्यानं मी काही म्हणालो नाही. राज्यसभेची दुसरी जागा आली, तेव्हा दुसऱ्यांना शब्द दिला. तेव्हा आम्हाला सांगितलं की, राज्यात गरज आहे आणि आता मकरंद पाटलांना मंत्रिपद दिलं. आता म्हणतायत राज्यसभेत जा. माझ्यासाठी ज्या लोकांनी जीव काढला, त्यांना मी काय सांगू. त्यामुळे मी राजीनामा देऊ शकत नाही. दोन वर्षात मी मतदारसंघाचे काम करेन, नंतर बघू. यानंतर मी म्हणालो, की बसू आणि चर्चा करू. पण ते झालंच नाही असं भुजबळ म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp