Sanjay Raut: 'फडणवीसांनी केसरकरांना जोड्याने मारलं पाहिजे'; महाराजांवरील वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक! 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'जे शत्रू देखील करू शकले नाहीत, ते भाजपने केलं'

point

एकनाथ शिंदेंकडून मर्जीतल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम- संजय राऊत

point

'मिंध्यांनी पोसलेली अफजल खानाची अवलाद...'; केसरकरांवर संजय राऊतांची जहरी टीका 

Sanjay Raut On Deepak Kesarkar : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. पण, अवघ्या आठ महिन्यात महाराजांचा पुतळा कोसळल्याने आता विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. या घटनेनंतर शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. तर, 'फडणवीस सच्चे शिवभक्त असतील तर त्यांनी केसकरला बुटाने मारलं पाहिजे,' असं म्हणत संजय राऊत आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. (chhatrapati shivaji maharaj statue collapsed in sindhudurga malvan sanjay raut criticize Mahayuti PM Modi )

'जे शत्रू देखील करू शकले नाहीत, ते भाजपने केलं'

"महाराष्ट्रात छत्रपतींचा असा अवमान कधीच झाला नव्हता. औरंगजेब, मुघल राज्यांनीही अनेकदा आमच्यावर हल्ले केले पण, छत्रपतींचा असा अवमान मुघल सरदारांनीही केला नव्हता. आग्रातून छत्रपती स्वाभिमानाने सुटून बाहेर आले पण, आपल्याच राज्यात त्यांच्यावर कोसळून पडण्याची वेळ आली. या सर्वाला जबाबदार पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत." अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारला घेरलं.

हेही वाचा : Gold Price Today: हद्दच झाली! घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; एका क्लिकवर बघा आजचा भाव...

एकनाथ शिंदेंकडून मर्जीतल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम- संजय राऊत

"सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम केलं. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम दिलं. या लोकांना याचं किती कमीशन मिळालं हे पाहावं लागेल. ठेकेदार, शिल्पकार हे सर्व ठाण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट... आज महाराष्ट्र दु:खी आहे. पण, सरकार अजूनही हसतंय, त्यांच्या चेहऱ्यावर वेदनाही दिसत नाही. सरकार म्हणत आहे समुद्रावर वारा होता, हे कोणाला मुर्ख बनवतायत... पाण्यात असंख्य पुतळे आहेत. शिखरावर आहेत, पहाडावर आहेत... प्रतापगडावर आहे. 120 ते 600 किलोमीटर वेगाने प्रतापगडावर वारे वाहत आहे. नेहरुंनी, शाहू महाराजांनी स्थापना केलेले पुतळे तसेच आहेत. पण सात महिन्यांपूर्वीचा पुतळा वाऱ्याने पडला? किल्ल्याच्या बाजूला नारळी पोफळीची झाडे आहे, लोकांची घरे आहेत. पत्रे उडाले नाही, झाडे पडली नाही. वादळात झाडे आणि पत्रे उडतात. तसं काही दिसलं नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : 'तेच नातं, तोच गोडवा' आता नव्या स्वरूपात!, 'चितळे बंधू'च्या ब्रँड अ‍ॅम्बॅसेडरपदी भारतरत्न सचिन तेंडुलकर!

पुतळा पडला कारण पुतळा पोकळ होता. भ्रष्टाचार झाला होता. पुतळा पडला त्याचं कारण ठाणे कनेक्शन आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कनेक्शन आहे. मी सांगत नाही. बातम्या सांगत आहेत. त्यावर खरं तर विद्यमान न्यायमूर्तीच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करा. चौकशी करा," अशी मागणीही संजय राऊतांनी केली.

'मिंध्यांनी पोसलेली अफजल खानाची अवलाद...'; केसरकरांवर संजय राऊतांची जहरी टीका 

फडणवीसांनी केसरकरांना जोड्याने मारलं पाहिजे. त्यांना जर वाटतं की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल... मग, ही मिंध्यांनी पोसलेली अफजल खानाची अवलाद आहे. हे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. हे सडक्या विचाराचे लोक आमच्याकडून गेले बरं झालं. यांच्या तोंडातून हे शब्द कसे निघू शकतात. बरं झालं पुतळा पडला, त्यातून शुभ शकून घडेल असं म्हणणारी माणसं कशी असू शकतात. हे फडणवीसांचं पाप आहे. महाराजांचा पुतळा पैसे खाण्यासाठी पाडला हा आरोप नाही सत्य आहे, अशा शब्दात दीपक केसरकरांवर संजय राऊतांनी टीका केली.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT