Eknath Shinde: 'तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल', शिंदेंनी शरद पवारांचा तो किस्सा सांगितला

मुंबई तक

ADVERTISEMENT

political
mahavikas aghadi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंना सत्तेचा मोह 2004 पासून

point

Eknath Shinde: 'तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल'

Eknath Shinde: कोल्हापूरात सुरु असलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेचा मोह आता झाला नाही तर त्यांचा 2004 पासून सत्तेचा मोह होता अशी गंभीर टीकाही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर केली. यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवताना आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांना दिलेल्या अश्वासनानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या राजकारणावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. 

ADVERTISEMENT

शिंदेंच्या प्रतिक्रियेची भीती

एक पक्ष प्रमुखाला सत्तेचा मोह आतापासून नव्हता.2004 पासून होता, सुप्त इच्छा होती. त्या घटनेला अर्जुन खोतकर साक्षीदार आहेत. तर त्यांच्याबरोबरच आणखी काही लोकं साक्षीदार आहेत. शरद पवार यांनी सांगितले की, तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल. त्यावेळी ते घाबरले होते. कारण त्यांना एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रियेची भीती वाटत होती असंही त्यांनी त्यावेळची एक आठवण सांगितली. 

सत्तेचा मोह 2004 पासून

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना सत्तेचा मोह हा आताच झाला नाही तर तो 2004 पासून होता अशी गंभीर टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली. 

हे वाचलं का?

तुम्ही व्हा पुढं

यावेळी त्यांनी शरद पवारांनी ज्यावेळी उद्धव ठाकरे यांना सांगितले की, 'तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्याचवेळी त्यांना सत्तेचा मोह झाला. मात्र त्यांना एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया पाहायची होती. मात्र त्यावेळी मी त्यांना सांगितले की, तुम्ही व्हा पुढं, कारण त्यांना त्याआधीपासूनच सत्तेचा मोह झाला होता. त्याचवेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यत्व विकून टाकल्याचीही त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे'. 

युती झाली म्हणून

महाविकास आघाडी सरकार येण्याआधी शिवसेना आणि भाजपची युती झाली म्हणून लोकांनी तु्म्हाला निवडून दिलं. मात्र तुम्ही तसं न करता 2019 ला लग्न एका बरोबर केलं आणि संसार एका बरोबर केला असा आरोपही त्यांनी या शिवसेनेच्या महाअधिवेशनातून केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT