CM Devendra Fadnavis : "दादागिरी खपवून घेतली जणार नाही...", 'त्या' प्रकरणावरून भर सभागृहात फडणवीस संतापले
CM Devendra Fadnavis : इथे बॅलेटचं वोटिंग घ्यायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीला वोटिंग द्यायचं..ही कोणती पद्धत आहे? ही कोणती लोकशाही आहे? , असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
CM देवेंद्र फडणवीस सभागृहात कोणावर संतापले?
"लोकांना जाऊन तुम्ही धमकवता..ही धमकी होती.."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
CM Devendra Fadnavis Speech: राम सातपुतेंसारखा सर्वसाधारण कार्यकर्ता पाच वर्षे राब राब राबतो आणि एकट्या मारकडवाडीत 22 कोटी रुपयांची कामे करतो. त्यांना जास्त मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना जाऊन तुम्ही धमकवता..ही धमकी होती लोकांना..याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत. इथे बॅलेटचं वोटिंग घ्यायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीला वोटिंग द्यायचं..ही कोणती पद्धत आहे? ही कोणती लोकशाही आहे? लोकशाहीमध्ये अशाप्रकारे लोकांना धमकंवायचं..म्हणजे एखाद्या गावात आम्हाला मतं मिळाली नाही की, त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करायची..दादागिरी खपवून घेतली जाणार नाही लोकशाहीमध्ये..असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मारकडवाडीच्या बॅलेट पेपरच्या मतदानाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षावर हल्लाबोल केला.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ईव्हीएम संदर्भात या ठिकाणी (मारकडवाडीत) शंका घेतल्या गेल्या. पहिल्यांदा हे लक्षात ठेवा, या देशात 2012 पर्यंतच ईव्हीएम होतं. 2012 नंतर ईव्हीएम नाहीय. 2012 नंतर व्हीव्हीपॅट आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील महत्त्वाचा फरक काय आहे, व्हीव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरचं मतदान. आपण प्रत्येक जण मतदानाला जातो. आपण बटण दाबतो. बटण दाबल्यानंतर कोणाला मत मिळालं आहे त्याचं चिन्ह आपल्याला दिसतं. ते चिन्ह खाली जातं. ते बॅलेट बॉक्समध्ये जातं. पहिल्यांदा आपल्याला ते बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं. ते ऑटोमॅटिक झालं.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' दिवशी मिळणार डिसेंबरचा हफ्ता, सभागृहात CM फडणवीसांची मोठी घोषणा
ईव्हीएमनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटचीपण मोजणी केली जाते आणि हे दोन जुळलं तरच निकाल जाहीर केला जातो, त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाहीय, बॅलेट पेपरवरचं हे व्हीव्हीपॅट आहे. व्हीव्हीपॅटवर आपण निवडणूक करत आहोत. त्यामुळे जे ईव्हीएम..ईव्हीएम..ईव्हीएम चालू आहे ना, त्या ईव्हीएमचा अर्थ एवढाच आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र..जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलं आहे.
हे ही वाचा >> Mumbai Boat Accident: बोट अपघातातील 13 मृतांची ओळख पटली, यादी आली समोर
माहिती असून झोपेचं सोंग घेतात. त्यामुळे आपल्याला सांगितलं पाहिजे की 22 ते 24 ऑक्टोबरला प्रत्येकाच्या उपस्थितीत या सील होत्या. त्यानंतर 9 नोव्हेंबरला त्याच्या एका प्रक्रियेला सर्व राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते. 10 ते 11 नोव्हेंबरला कमिशननची प्रक्रिया सुरु झाली, तिथे सर्व राजकीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अकरा तारखेला सुरक्षा कक्ष उघडला तिथे सर्वांना उपस्थित राहण्याची मान्यता होती.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT