Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरणी CM फडणवीसांनी घेतला प्रचंड मोठा निर्णय

मुंबई तक

Santosh Deshmukh Murder SIT: बीड जिल्ह्यातील मसजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कारवाई केली आहे. सोमवारी, हत्येच्या चौकशीसाठी नवीन एसआयटी स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.

ADVERTISEMENT

CM Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case
CM Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवी SIT स्थापन

point

जुन्या एसआयटीमधील अधिकाऱ्यांना वगळण्यात आलं

point

नव्या एसआयटीमध्ये महिला अधिकाऱ्यांचाही केला समावेश

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटी (SIT) बाबत आता फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयीन तपासासोबतच एसआयटीचीही स्थापना करण्यात आली, परंतु आता पुन्हा एकदा या प्रकरणात नवीन एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. (cm devendra fadnavis takes huge decision in santosh deshmukh murder case forms new sit)

सुरुवातीला जी एसआयटी स्थापन करण्यात आलेली त्यावर देशमुख कुटुंबीयांसह अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतले होते. कारण त्या एसआयटीमध्ये अनेक अधिकारी हे बीडचेच होते. तसंच असाही आरोप होता की, यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी चांगले संबंधही होते. त्यामुळे एसआयटीमधील अधिकारी बदलण्यात यावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. ज्यानुसार आता सरकारने पुन्हा एकदा नव्या एसटीची स्थापना केली आहे. ज्याचे प्रमुख हे पूर्वीच्याच एसआयटीचे बसवराज तेली हे असणार आहेत.

हे ही वाचा>> संतोष देशमुखांच्या पत्नीचा पोलीस जबाब जसाच्या तसा, वाल्मिक कराडवर गंभीर आरोप...

नव्या एसआयटीमध्ये (SIT) कोणकोणते अधिकारी?

  1. श्रीमती किरण पाटील - अपर पोलीस अधिक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग छ. संभाजीनगर
  2. श्री.  अनिल गुजर - पोलीस उप अधिक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग बीड
  3. श्री. सुभाष मुठे -  पोलीस निरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग बीड
  4. श्री. अक्षयकुमार ठिकणे - पोलीस निरीक्षक, भरारी पथक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे
  5. श्रीमती शर्मिला साळुंखे - पोलीस हवालदार, भरारी पथक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे
  6. श्रीमती दिपाली पवार - पोलीस हवालदार, सीसीटीएनएस राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे

या अधिकाऱ्यांची आता नव्या एसआयटीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यामध्ये केवळ जुन्या एसआयटीमधील अनिल गुजर, पोलीस उप अधिक्षक यांना कायम ठेवण्यात आलं आहे.

जुन्या एसआयटीमध्ये कोणकोणते अधिकारी होते?

  1. श्री.  अनिल गुजर - पोलीस उप अधिक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग बीड
  2. श्री. विजयसिंग शिवलाल जोनवाल - स. पो. निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बीड
  3. श्री. महेश विघ्ने - पो. उ. निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बीड
  4. श्री. आनंद शंकर शिंदे - पो. उ. निरीक्षक पोलीस स्टेशन, केज 
  5. श्री. तुळशीराम जगताप - सहा. पो. उ. निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बीड
  6. श्री. मनोज राजेंद्र वाघ - पोलीस हवालदार/13, स्थानिक गुन्हे शाखा बीड
  7. श्री. चंद्रकांत एस. काळकुटे - पोलीस नाईक/1826, पोलीस स्टेशन केज 
  8. श्री. बाळासाहेब अहंकारे - पोलीस नाईक/1673,  पोलीस स्टेशन केज 
  9. श्री. संतोष भगवानराव गित्ते - पोलीस शिपाई/471,  पोलीस स्टेशन केज 

नव्या SIT स्थापनेचं संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा >> View PDF

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणात नियुक्त केलेल्या एसआयटीला संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. या अधिकाऱ्यांपैकी काहींचे वाल्मिकी कराडशी संबंध असल्याचा आरोप देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केला होता. यानंतर आता एसआयटीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसवराज तेली हे नवीन एसआयटीचे अध्यक्ष असतील.

हे ही वाचा>> Bajrang Sonawane: संतोष देशमुखांची हत्या का झाली? बजरंग सोनावणेंनी सांगितला 28 मे पासूनचा संपूर्ण घटनाक्रम

वाल्मिकी कराड यांच्यावर कारवाईची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, परंतु या प्रकरणात आरोपपत्र दाखल होऊनही वाल्मिकी कराड याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे मस्साजोग येथील ग्रामस्थ आज (13 जानेवारी) खूपच आक्रमक झाले आणि त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून निषेध करण्यास सुरुवात केली होती.

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखही या आंदोलनात सामील झालेले. यावेळी ग्रामस्थांनी वाल्मिकी कराड यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. या निषेधात मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हेही सहभागी झाले होते, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की वाल्मिकी कराड यांच्यावर खटला का चालवला जात नाही?

मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे आदेश दिले

सूत्रांचे म्हणणे आहे की,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या एसपी नवनीत कावत आणि सीआयडी अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आणि या प्रकरणातील तपासाच्या व्याप्तीचा आढावा घेतला. तपासादरम्यान कोणालाही दया दाखवू नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp