Eknath Shinde : "लाडक्या बहिणींना टच कराल, तर...", CM एकनाथ शिंदेंनी दिला मोठा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Eknath Shinde Latest News
Eknath Shinde On Ladki Bahin Yojana
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर केली सडकून टीका

point

लाडकी बहीण योजनेबाबत शिंदे नेमकं काय म्हणाले?

point

"एकदम करेक्ट कार्यक्रम होणार", शिंदेंचा निशाणा कुणावर?

CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार निवडणुकीचा तोंडावर लाडक्या बहिणींना पैसे देत आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. "योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही. ते आता खुलेआम बोलायला लागले आहेत. त्यांना एव्हढी जलसी आहे? लोकं त्यांच्या विरोधात जातील. लाडकी बहीण योजनेला कुणी टच करायला गेला, त्याचा कार्यक्रमच झाला समजा", एकदम करेक्ट कार्यक्रम होणार, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. 

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, विरोधक म्हणतात आम्ही आलो तर या सर्व योजना बंद करणार. जेलमध्ये टाकणार. पोलखोल करणार. कुणाला टाकणार? योजना बंद करणार? यापूर्वी तुमची पोलखोल झालेलीच आहे. कोविडमध्ये झाली आहे. काही लोक जेलमध्ये गेले. योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही. ते आता खुलेआम बोलायला लागले आहेत. त्यांना एव्हढी जलसी आहे? लोकं त्यांच्या विरोधात जातील. लाडकी बहीण योजनेला कुणी टच करायला गेला, त्याचा कार्यक्रमच झाला समजा. एकदम करेक्ट कार्यक्रम होणार.

हे ही वाचा >> Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे 'YouTube' कनेक्शन! मुंबई पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

आमच्या लाडक्या बहीणी बिलकूल ऐकून घेणार नाहीत. लाडक्या बहिणींना केंद्र सरकार, मोदी सरकार आणि आम्ही सांगितलंय, तुम्हाला लखपती बनवणार. माझं काय पेक्षा, माझ्या बहिणींचं काय? माझं काय, माझं काय बघून उद्योजक पळून गेले. आम्ही ठरवलंय की, आम्ही सर्व सामान्य माणसाला काय देणार? सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस काय येणार? बदल काय होणार? हे आम्ही ठरवलं आहे. यासाठी आम्ही काम करतोय. आम्ही आमच्या वैयक्तीक लाभासाठी एकतरी निर्णय घेतलाय का? हे तुम्ही सांगा. आम्ही जे जे निर्णय घेतले, ते शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता-भगिनी, युवक-युवती ज्येष्ठ या सर्वांसाठी घेतले, असंही शिंदे म्हणाले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: ...तरच तुम्हाला मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस! महिलांनो एकदा अटी तर वाचा

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

जनतेचं जीवन बदलण्याच्या योजना खऱ्या अर्थाने आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या योजनांना मिळणारा प्रतिसाद बघून आमचे विरोधक थोडेसे गडबडलेले आहेत. काही जण म्हणतात घाबरलेले आहेत. पण मी तसं नाही म्हणणार, ते गडबडलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळं ते गडबडून गेले आहेत. आम्ही ही योजना जेव्हा जाहीर केली, तेव्हा या योजनेची अंमलबजावणी होणारच नाही, असं ते म्हणायचे. अर्ज भरले जातील, पण पैसेच देणार नाही, अशी टीका आमच्यावर केली. अडीच कोटी माय माऊलींच्या खात्यात पाच महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. त्यांच्या अर्जानुसार पत्येकी साडेसात हजार रुपये जमा झालेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT