CM Eknath Shinde : "मला हलक्यात घेऊ नका...", दसरा मेळाव्यात शिंदेंनी कुणाला दिला इशारा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

CM Eknath Shinde Latest News
CM Eknath Shinde Speech At Dussehra Melava
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं मोठं विधान

point

दसरा मेळाव्यात शिंदे नेमकं काय म्हणाले?

point

शिंदेंनी विरोधकांना दिला मोठा इशारा

CM Eknath Shinde Dussehra Melava Speech : "महाराष्ट्रविरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं. तेव्हा काही लोक म्हणत होते, हे सरकार टीकणार नाही. एका महिन्यात पडेल. दुसऱ्या महिन्यात पडेल. सहा महिन्यात पडेल. पण टीका करणाऱ्याला हा तुमचा एकनाथ शिंदे पुरून उरला. जनतेच्या आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि साथीने हा घासून पुसून नाही, तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. असा स्वस्तात जाणारा नाही. मला हलक्यात घेऊ नका, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

शिंदे पुढे म्हणाले, "मी मैदानातू पळणारा नाही, पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाही. आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर वन आणण्याचं काम आपण केलं. जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, तेव्हा आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर होतं. सहा महिन्याच्या आत आपण आपलं राज्य पहिल्या नंबरवर आणलं. परदेशी गुंतवणूकित पहिला नंबर, महिला सक्षमी करणात पहिला नंबर, एक रुपयात पीक विमा देण्यात पहिलं नंबर, कृषी सन्मान योजनेत मोदी साहेबांचे सहा हजार आणि आपले सहा हजार असे बारा हजार देणारं आपलं सरकार आहे.

हे ही वाचा >>  Sushama Andhare : ''सरसंघचालक साहेब देवेंद्रजींचे कान उपटा'', दसरा मेळाव्यात अंधारे कडाडल्या!

"लोकांच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. सत्तांतर झालं नसतं, तर लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते. कल्याणकारी योजना थांबल्या असत्या. उद्योग आले नसते आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना पण आली नसती. माझ्या लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला नसता. बहिणींना ताबडतोब न्याय मिळाला नसता. शासन आपल्या दारी आलं नसतं. तरुणांना प्रशिक्षण देणारी योजना आली नसती. ज्येष्ठांना वयोश्री योजना आणि तीर्थ दर्शन योजनाही मिळाली नसती. पहिल्या अडीच वर्षात काय झालं आपल्याला माहिती आहे. त्या अडीच वर्षात महाराष्ट्रविरोधी आघाडी या राज्यात सत्तेत होती. दिसेल ते काम बंद पाडण्याचा सपाटा त्यांनी लावला होता, असंही शिंदे म्हणाले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>  CM Eknath Shinde : लाडक्या बहिणींनो! CM शिंदेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली मोठी घोषणा

रामदास कदमांचंही शिवसेनेच्या दसरा मेळ्याव्यात मोठं विधान

"मला सर्वात आधी मोदी साहेबांना धन्यवाद द्यायचं आहे. कुसुमाग्रजांनी सांगितलं होतं, मराठी भाषा ही मंत्रालयाच्या दरवाज्यासमोर, डोक्याभोवती सोन्याचा कळस आणि अंगात फाटके कपडे घालून हात जोडून उभी आहे. मला न्याय कधी देणार आहेत, अशी भीख मागत आहेत, असं कुसुमाग्रज यांनी म्हटलं होतं. आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय, या मराठी भाषेला, मराठी मातीला आणि मराठी माणसाला स्वाभिमान दिला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. त्यांना मी महाराष्ट्राच्या वतीनं सॅल्यूट देतो", असं कदम म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT