Eknath Shinde: "हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना...", दसरा मेळाव्यात CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

CM Eknath Shinde Speech
Eknath Shinde On Uddhav Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले

point

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ

point

आझाद मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळ्यात शिंदे नेमकं काय म्हणाले?

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू, बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, ही गर्जना देऊन हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा सभेची सुरुवात करायचे, तेव्हा माझ्यासकट सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. ती आठवण आपल्या सर्वांना आहे. खऱ्या अर्थाने गर्व से कहो, मैं हिंदू आहे. ही सिंहगर्जना बाळासाहेबांनी देशाला दिली. पण हल्ली काही लोकांना या शब्दाची अॅलर्जी झाली आहे. हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटायला लागली आहे. हिंदूहृदय म्हणायला काही लोकांची जीभ कचरू लागली आहे. पण आपल्याला हा शब्द उच्चारायला लाज नाही, तर अभिमान आणि स्वाभिमान वाटतो. पण हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना आता लाज वाटत आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केली, म्हणून आजाद शिवसेनाचा हा आझाद मेळावा आहे. इथे शिवसैनिकांचा जनसागर लोटला आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे घणाघाती टीका केली. 

"कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाही"

शिवसैनिकांना संबोधीत करताना शिंदे पुढे म्हणाले, खरं म्हणजे महाराष्ट्रविरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं. तेव्हा काही लोक म्हणत होते, हे सरकार टीकणार नाही. एका महिन्यात पडेल. दुसऱ्या महिन्यात पडेल. सहा महिन्यात पडेल. पण टीका करणाऱ्याला हा तुमचा एकनाथ शिंदे पुरून उरला. जनतेच्या आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि साथीने हा घासून पुसून नाही, तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. असा स्वस्तात जाणारा नाही. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातू पळणारा नाही, पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाही. 

हे ही वाचा >> Manoj Jarange : "माझ्या समाजाची लेकरं संपवू नका, नाहीतर...", मनोज जरांगेंचा सरकारला मोठा इशारा

"बाळासाहेबांची विचार घेऊन आम्ही निघालो आहोत. महाराष्ट्रात जिथे जिथे हा एकनाथ शिंदे विचार घेऊन जातो, तिकडे सर्वजण हसतमुखाने स्वागत करतात आणि आशीर्वाद देतात. हेच आपण कमवलं आहे. दोन वर्षात अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार. लाडक्या भावांचं लाडकं सरकार. लाडक्या शेतकऱ्यांचं लाडकं सरकार. आपण उठाव का केला, हे मला सांगायची गरज नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, अन्यायावर पेटून उठा. अन्यायाला लात मारा. अन्याय सहन करू नका. जेव्हा अन्याय होऊ लागला तेव्हा आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता, तर शिवसेनेचं, शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Pankaja Munde : ''मी कुणालाही घाबरत नाही, आपला डाव खेळणार...'', पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर जरांगे?

सच्चा शिवसैनिकांचा अपमान होत राहिला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. ही वस्तूस्थिती आहे. आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर वन आणण्याचं काम आपण केलं. जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, तेव्हा आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर होतं. सहा महिन्याच्या आत आपण आपलं राज्य पहिल्या नंबरवर आणलं. परदेशी गुंतवणूकित पहिला नंबर, महिला सक्षमी करणात पहिला नंबर, एक रुपयात पीक विमा देण्यात पहिलं नंबर, कृषी सन्मान योजनेत मोदी साहेबांचे सहा हजार आणि आपले सहा हजार असे बारा हजार देणारं आपलं सरकार आहे. शेतकऱ्यांना वीज मोफत देणारं हे सरकार आहे. विरोधक म्हणत होते, लाडक्या बहिणी आता लाडक्या भावाचं काय? दहा लाख लाडके भाऊ सुशिक्षीत बेरोजगार यांना प्रशिक्षण भत्ता देणारं हे पहिलं सरकार आहे", असंही शिंदे म्हणाले.


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT