Diwali Bonus: निवडणूक जाहीर होण्याआधी मुख्यमंत्री शिंदेंकडून 'एवढ्या' हजारांचा बोनस जाहीर
BMC Diwali Bonus: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अगदी काही मिनिटे अगोदर मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना भरघोस दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
बीएमसी कर्मचाऱ्यांना तब्बल 29 हजार रुपये मिळणार बोनस
इतरही शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून बोनस जाहीर
CM Shinde announce Diwali Bonus: मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर करण्याच्या काही मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खालच्या स्तरावरील सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला. त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कर्मचाऱ्यांना तब्बल 29 हजार रुपयांचा बोनसही जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम तीन हजार रुपये अधिक आहे. (cm shinde big gift a few minutes before the announcement of maharashtra assembly elections bmc employees will get diwali bonus of rs 29 thousand)
ADVERTISEMENT
कोणाकोणाला मिळणार दिवाळी बोनस?
बालवाडी शिक्षक आणि आशा वर्कर्स यांनाही बोनस जाहीर करण्यात आला आहे. तसेच सामाजिक आरोग्य स्वयंसेवकांना 12,000 रुपये आणि बालवाडी शिक्षक/सहाय्यकांना 5,000 रुपये दिवाळी बोनस म्हणून मिळतील.
हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'नो 5500 रूपये कसे येणार खात्यात?
काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील म्युनिसिपल लेबर युनियनने बीएमसी कर्मचाऱ्यांना 40,000 रुपयांचा दिवाळी बोनस देण्याची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांना एक्स-ग्रेसिया बोनस देण्याची विनंती युनियनने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांकडे केली होती. गेल्या वर्षी, मुख्यमंत्री शिंदे यांनी 8 नोव्हेंबर रोजी बीएमसी कर्मचाऱ्यांना 26,000 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला होता.
हे वाचलं का?
महाराष्ट्रात कधी होणार निवडणुका?
दरम्यान, निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल. त्याचवेळी काँग्रेस खासदाराच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा जागेवरील पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून विधानसभा निवडणुकीसह 23 नोव्हेंबरलाच त्याचा निकाल जाहीर होणार आहे.
हे ही वाचा>> Manoj Jarange : ''मराठ्यांची लेकरं भिकारी करण्यासाठी फडणवीसांनी...'', जरांगे कडाडले!
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत, त्यापैकी 4.97 कोटी पुरुष, 4.66 कोटी महिला आणि 20.93 लाख प्रथमच मतदार आहेत. राज्यात 36 जिल्हे आणि एकूण 288 विधानसभा जागा आहेत, त्यापैकी 234 सर्वसाधारण जागा आहेत, 25 अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत आणि 29 अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.
ADVERTISEMENT
सध्याच्या महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT