NCP Split : ‘या’ निकषावर ठरणार राष्ट्रवादी कुणाची? प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान
राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटाचा वाद टोकाला गेला आहे. त्यातच 30 जूनच्या अगोदरझालेल्या राष्ट्रवादीतील नियुक्त्या या पवार गटाने घटनाबाह्य ठरवल्या आहेत. तसेच आता नागालँडमधील एनसीपीचा दाखला देत त्यांनी राष्ट्रवादी मोठा दावा केला आहे.
ADVERTISEMENT
Controversy in NCP : राज्यात काल शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या सुनावणीचा विषय ताजा असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील (Nationalist Congress Party) संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. काका-पुतण्याच्या राजकीय वादाला आता गती आल्याने आता साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाने असा दावा केला आहे की, 30 जूनपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, आणि ज्या पालन करत नाही, त्या घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट होते. मात्र पक्षाचे चिन्ह कोणाला द्यायचे हे मात्र बहुमताच्या आकड्यावर ठरणार असल्याचेही अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार गटाचा संघर्ष आता टोकाला गेल्याचे सांगितले जात आहे. (controversy rages ncp praful patel ajit pawar faction appointments party are unconstitutional)
ADVERTISEMENT
बहुमतावर विश्वास
अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील 43 आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्याच बरोबर आम्ही बहुमतावर विश्वास ठेवणारे असून कोणताही राजकीय पक्ष हा केवळ स्वतःच्या घटनेच्या घटनात्मकतेवर काम करत असतो. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेनुसार पक्षातंर्गतही कोणत्याही निवडणुका पार पडल्या नाही. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये 30 जूनपूर्वी झालेल्या नियुक्त्या या घटनाबाह्य असल्याचेही पटेल यांनी सांगितले.
नागालँडमध्येही पाठिंबा
राज्यातील घडामोडींबरोबरच प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले की, नागालँडमधीलही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातही आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी मार्चमध्ये राष्ट्रवादीने नागालँडमधील एनडीए सरकारला पाठिंबा दिला त्यावेळची आठवणही त्यांनी करुन दिली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Pankaja Munde : वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर जीएसटीची कारवाई, पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
पक्षावर आणि चिन्हावरही दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात 2 जुलै रोजी अजित पवार यांनी बंड केले. त्यानंतर अजित पवार गटाने पक्षावर आणि चिन्हावरही दावा केला आहे. अजित पवार गटाने असा दावा केला आहे की 30 जून रोजी शरद पवार यांच्या जागी अजित पवार हे पक्षाचे प्रमुख असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी आता 6 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगासमोर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केला जाणार आहे.
आमदारांविरोधात याचिका
अजित पवार गटाने आता असा मोठा दावा केला आहे की, 30 जूनपूर्वी झालेल्या पक्षातील नियुक्त्या या घटनाबाह्य असून राजकीय पक्ष आणि प्रतिनिधीत्व केवळ बहुमतावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या दोन्ही गटानेही आता आमदारांविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या आहेत.
ADVERTISEMENT
संघटनात्मक नियुक्त्या
प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीही पक्षातंर्गत निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी त्यांची निवड केलेली नाही. कारण संघटनात्मक नियुक्त्या या निवडणुकीद्वारे केल्या जातात. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह कोणाचे हे ठरवण्याचा निर्णय निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फतच घ्यावा लागतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT
शिंदे गटाचे प्रकरण वेगळे
अजित पवार गटाने यावेळी एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे गटाचे प्रकरण आणि आमच्या अजित पवार गटाचे प्रकरण वेगळे आहे. तरीही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावरही दावा केला आहे, आणि निवडणूक आयोगानेही त्यांच्याच बाजूने निकाल दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> ‘…त्याचे प्रायश्चित तुम्ही घेणार आहात का?’, ठाकरेंचा फडणवीसांना रोकडा सवाल
आमच्या भूमिकेवर विश्वास
पत्रकार परिषदेत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका लढवणार का असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडे 6 ऑक्टोबरपासून 15 ते 20 दिवसामध्ये निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतर अजित पवार गट त्याविषयी निर्णय घेईल, त्यामुळे त्याविषयी आताच काही स्पष्ट करु शकत नाही. तसेच आमचा आमच्या भूमिकेवर विश्वास असून निकालही आमच्याच बाजूने लागेल असा विश्वासही प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT