"दिल्लीच्या तख्तावर एनडीए आणि मोदीजींचा भगवा, लाडक्या बहिणीला...", DCM एकनाथ शिंदे दिल्लीत नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

DCM Eknath Shinde Speech :"27 वर्षानंतर आज दिल्लीच्या तख्तावर एनडीए आणि मोदीजींचा भगवा झेंडा फडकला आहे. रेखा गुप्ता या लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री बनवलेलं आहे"

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे- फाइल फोटो
एकनाथ शिंदे- फाइल फोटो
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान

point

DCM एकनाथ शिंदेंनी दिली मोठी प्रतिक्रिया

point

दिल्लीत एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

DCM Eknath Shinde Speech :"27 वर्षानंतर आज दिल्लीच्या तख्तावर एनडीए आणि मोदीजींचा भगवा झेंडा फडकला आहे. रेखा गुप्ता या लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री बनवलेलं आहे. त्यामुळे एक आनंद आहे आणि समाधानही आहे. गेले अनेक वर्ष दिल्लीत होणारं प्रदुषण, वाहतूक कोंडी असेल, या सर्व गोष्टींना आता चालना मिळेल. विकासाला चालना मिळेल. जसं महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार काम करत होतं आणि केंद्राची देखील आम्हाला मदत मिळत होती. दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे. इथे जगभरातले लोक येतात. मुंबईत जसे येतात, तसे दिल्लीत येतात. मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी, मोठ्या प्रमाणात होणारं प्रदुषण, जी डेव्हलोपमेंट इथे थांबली होती, त्या डेव्हलोपमेंटला प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता चालना देतील आणि दिल्लीकरांना त्याचा फायदा होईल, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना केलं. 

एकनाथ शिंदे म्हणाले, एनडीए आणि मोदीजींचा भगवा झेंडा फडकला आहे. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या कामकाजाबद्दल, विकासबद्दल चर्चा केली. जीवे मारण्याच्या धमकीबाबत बोलताना शिंदे म्हणाले, मला पोलिसा आयुक्तांनीही फोन केला आहे. अशा अनेक वेळा मला धमक्या येऊन गेलेल्या आहेत. पण त्या धमक्यांचा मी कधी विचार केला नाही. मी माझं काम करत राहिलो आणि आताही काम सुरुच राहणार. मी माझं काम करतो. "आरोपाला आरोप करत नाही. टीकेला टिकेनं उत्तर देत नाही. एका मराठी माणसाने मराठी माणसाला पुरस्कार दिला. तिथे पवार साहेब आणि महादजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते", असं म्हणत शिंदेंनी संजय राऊतांवर निशणा साधला. 

हे ही वाचा >> Pratap Sarnaik : "तुळजापूर, धाराशिवमधून ड्रग्ज तस्करांचा नायनाट करा, नाहीतर...", सरनाईकांनी पोलिसांनाही दिला इशारा

"आमच्यात कोणताही कोल्ड वॉर,हॉट वॉर नाही. आमचा अजेंडा काय आहे, या महाराष्ट्राला पुढे नेणं. महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या जीवनात चांगले दिवस आणणे. आम्ही टीम म्हणून जे अडीच वर्ष काम केलं, त्यामुळे या विधानसभा निवणडणुकीत लोकांनी भरभरून मतदान केलं. 232 आमदार आले. त्याच वेगाने आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि पुढे जातोय. मी अडीच वर्षात खूप काम केलं, याचं समाधान आणि आनंद आहे मला, असं म्हणत शिंदे-फडणवीस यांच्या कोल्डवॉरच्या चर्चांवर शिंदेंनी पडदा टाकला.

हे ही वाचा >> Dhananjay Munde : अंजली दमानियांनंतर RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचेही धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

हे वाचलं का?

    follow whatsapp