Video: 'कॉमन मॅन'साठी DCM एकनाथ शिंदेंनी अचानक ताफा थांबवला! मुंबईच्या रस्त्यावर घडलं तरी काय?
DCM Eknath Shinde Stops Convoy : डीसीएम म्हणजेच 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन' असं म्हणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या रस्त्यावर ताफा अचानक का थांबवला?

दुचाकीस्वार दिसताच शिंदेंनी ताफा थांबवला अन्...

एकनाथ शिंदेंचा तो व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
DCM Eknath Shinde Stops Convoy : डीसीएम म्हणजेच 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन' असं म्हणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला की, संवेदनशील बनून उपमुख्यमंत्री शिंदे वैद्यकीय मतदीसाठी धावतात, हे अनेकदा समोर आलं आहे. मुख्यमंत्री असताना शिंदेंनी अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी आपला ताफा थांबवल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून अनेकदा पाहायला मिळालंय. आज 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी शिंदेंनी ते खरोखरच डेडिकेटेड टू कॉमन मॅन असल्याचा दाखला दिला आहे. एकनाथ शिंदेंचा ताफा पूर्व द्रुतगती महामार्गावरून घाटकोपर जवळ येत असताना एका दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याचं शिंदेंनी पाहायला. या जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी शिंदेंनी त्यांचा ताफा लागलीच थांबवला आणि त्या व्यक्तीसाठी तत्काळ मदकार्य सुरु केलं.
नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाणे येथीस साकेत मैदानात ध्वजवंदन सोहळा पार पडला. त्यानंतर शिंदे वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी ठाण्याहून मुंबईला जायला निघाले होते. परंतु, शिंदेंचा ताफा पूर्व द्रुतग्रती मार्गावरून घाटकोपर जवळ आल्यावर अचानक थांबवण्यात आला. कारण या रस्त्याच्या बाजूला एक दुचाकीस्वार अपघातामुळे जखमी झाल्याचं शिंदेंच्या निदर्शनास आलं. त्यानंतर शिंदेंनी तातडीनं त्या जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी मदतकार्य सुरु केलं. तसच ताफ्यातील गाडी आणि पोलिसांच्या मदतीने त्या जखमी व्यक्तीला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सांगितलं.
हे ही वाचा >> Ind vs Pak: मोठ्या-मोठ्या वल्गना करणारा पाकिस्तान भारताच्या जवळपासही नाही, आकडेच सारं काही बोलतात!
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना आपल्या भाषणात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, तर कॉमन मॅन असा उल्लेख केला आहे. परंतु, शिंदे आता डीसीएम म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यावरही ते किती संवेदनशील आहेत, याची प्रचिती संपूर्ण राज्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. मी डीसीएम नाही, तर मी डेडिकेटेट टू कॉमन मॅन आहे, असं शिंदे म्हणतात. आज प्रजासत्ताक दिनी शिंदेंनी अपघातग्रस्त तरुणाला ताफा थांबवून मदत केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे उपमुख्यमंत्री कॉमन मॅनसाठी किती संवेदनशील आहेत, हे पुन्हा एकदा या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.